आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस प्रशिक्षकांच्या शिष्याने जागतिक स्पर्धेत पटकावले सुवर्ण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पाचवेळा विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धेचे विजेते अमरावतीचे रणवीरसिंग राहल यांचा शिष्य महाराष्ट्र पोलिस दलात कार्यरत रवींद्र जगतापने जागतिक पोलिस कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. ७० किलो फ्रीस्टाईल प्रकारात सुवर्ण ७१ किलो ग्रीको रोमन प्रकारात त्याने रौप्यपदकाची कमाई करून इतिहास रचला. यापूर्वी हिंद केसरी मारुती माने यांनी जकार्ता येथे अशीच कामगिरी केली होती. त्यांनीही दोन पदके जिंकली होती. 
 
रवींद्र जगताप हा पुणे पोलिस दलात कार्यरत असून त्याला पोलिस प्रशिक्षक रणवीरसिंग राहल, कळंतरे हनुमंत अण्णा जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. 
 
अमरावतीच्या रणवीरसिंग राहल यांच्याकडे दोन वर्षांपूर्वी राज्य पोलिस कुस्ती संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यावेळपासून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरासाठी कुस्तीपटूंना आवश्यक सर्व सोयी करून घेत उत्तम पोलिस कुस्तीपटू तयार केले आहेत. 
 
यासाठी त्यांना विदर्भ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील कामगिरीचा लाभ झाला. अमरावतीकर गुरुच्या मार्गदर्शनात हे यश मिळाल्याने शहराच्या नावलौकिकात आणखी भर पडली आहे. 
बातम्या आणखी आहेत...