आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोख येथे मित्रानेच केला गवंडी मित्राचा सुरीचे घाव घालून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खून झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस. - Divya Marathi
खून झाल्यानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलिस.
दिग्रस - गवंडीकाम करणाऱ्या अविवाहित युवकाची त्याच्याच मित्राने निर्घृण हत्या केल्याची घटना जानेवारी रोजी सकाळी तालुक्यातील मोख क्रमांक येथे उघडकीस आला. मित्रानेच हा घात केल्याची तक्रार मृतकाच्या पुतण्याने पोलिसात दिली. 
 
समाधान श्रीराम भगत वय ३३ असे हत्या झालेल्या युवकाचे नाव असून, त्याला जानेवारी रोजी रात्री वाजता घराचे रंगकाम करणारा त्याचा मित्र कैलास विश्राम भगत (वय ३०) याने समाधानला त्याच्या घरून जेवणाच्या ताटावरून उठवून गावातच मिळणाऱ्या दारू अड्ड्यावर दारू पिण्यास नेले दारू पिऊन आल्यावर घराकडे जाताना दोघांमध्ये नेहमीसारखी शिवीगाळ वाद सुरू झाला. दरम्यान, रस्त्याच्या कडेला शेकोटी पेटवून बसलेल्या काही तरुणांना समाधान रस्त्यावर पडून असल्याचे दिसले. त्यानंतर काही जणांनी त्याला घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोडून दिले. काही वेळाने कैलासने आपल्या घरातील सुरी आणली तो एका ठिकाणी पडून असल्याचे पाहून त्याच्या गळ्यावर नंतर शरीराच्या अन्य भागांवर वार केले. सकाळची कामे उरकून तो सुद्धा घटनास्थळावर हजर होता. तेव्हा गुरुवारी रात्री कैलासने जेवता-जेवता समाधानला दारू पिण्याकरिता नेल्याचे त्याच्या घरातील सदस्यांनी काही ग्रामस्थांनी कैलासला त्याच्या सोबत बघितल्याचे सांगितले. यावरून मृतकाचा पुतण्या ज्ञानेश्वर गणपत भगत याने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा नोंदवून कैलासला ताब्यात घेतले. त्याला ठाण्यात आणून पोलिसी खाक्या दाखवताच समाधानचा सुरीने खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणी पीएसआय दिनेश चव्हाण बाबाराव पवार तसेच सहकारी देविदास आठवले, नारायण पवार, विवेक सूर्यवंशी तपास केला. 
 
अश्लील शिवीगाळ केल्याचा राग 
समाधानदारू पिऊन मला माझ्या कुटुंबीयांना अश्लील शिवीगाळ करत होता. अनेक दिवसांपासून त्याच्या या कृत्याचा राग मनात होता. त्यामुळे त्याचा खून केल्याचे कैलासने पोलिसांना सांगितले. कैलासला जानेवारीला दिग्रस न्यायालयात हजर करण्यात येईल
बातम्या आणखी आहेत...