आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने चमकवणाऱ्या भामट्यांनी घातला पावणेचार लाखांचा गंडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील स्वस्तीकनगर कोतवाली ठाण्याच्या हद्दीतील कॅम्प परिसरात दोन महिलांच्या घरात जाऊन सोने चमकवून देतो, अशी बतावणी करून दोन अज्ञातांनी तब्बल दीडशे ग्रॅम वजनाचे सुमारे पावणेचार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना सोमवारी (दि. २४) सकाळी १० ते ११ वाजतादरम्यान घडल्या आहेत. 
 
स्वस्तीक नगरमध्ये राहणाऱ्या नीता जग्गनाथ गव्हाणकर (४३) यांच्या घरी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दोन अनोळखी युवक आलेत. सोन्याचे दागिने पॉलीशद्वारे चमकवून देतो, असे त्यांनी गव्हाणकर यांना सांगितले. त्यांनी होकार देताच त्यांनाच घरातून एक भांडे आणायला सांगितले. त्यांनी भांडे आणले, त्यामध्ये थाेडे पाणी घेऊन या भामट्यांनी त्यांच्याजवळ असलेले एक रसायन या पाण्यात टाकून त्यामध्ये चमकावचे दागिने गव्हाणकार यांना मागितले. त्यावेळी गव्हाणकर यांनी ६० ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या त्यांना दिल्या. या दोन्ही बांगड्या पाण्यात टाकून भामटे निघून गेलेत. जातेवेळी त्यांनी गव्हाणकार यांना सांगितले की, काही वेळानंतर या भाड्यांतून दागिने काढून घ्या, त्यामुळे काही वेळानंतर गव्हाणकर यांनी भांड्यात हात टाकून पाहिला तर दागिने नव्हते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी राजापेठ ठाणे गाठून तक्रार दिली. या घटनेनंतर अवघ्या अर्ध्या तासानेच शहरातील उच्चभ्रू वस्ती असलेल्या मांगिलाल प्लॉट परिसरातील निर्मला वऱ्हेकर यांच्या घरात दोन भामटे आलेत, या ठिकाणीही आलेल्या दोघांनी वऱ्हेकर यांना पॉलीशव्दारे दागिने चमकवणार असल्याचे सांगून गव्हाणकर यांच्या घरी केलेली प्रक्रियाच केली. वऱ्हेकर यांनी मंगळसूत्र, बांगड्या असे एकूण ९० ग्रॅम दागिने त्यांच्याजवळ दिले.
काही वेळानंतर भाड्यांत काहीच नव्हते. 
 
या प्रकरणी वऱ्हेकर यांच्या तक्रारीवरून कोतवाली तर गव्हाणकार यांच्या तक्रारीवरून राजापेठ पेालिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही घटनेतील भामटे एकच किंवा एका टोळीतील असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...