आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गुडमॉर्निंग’ पथकाचा धाक; शौचालयाचा वापर झाला सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखताना पथकाचे सदस्य. - Divya Marathi
उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखताना पथकाचे सदस्य.
दिग्रस - तालुक्यात पंचायत समितीने ‘गुडमॉर्निंग’ पथक तयार केले आहे. त्यामुळे शौचास उघड्यावर बसणाऱ्यांना चांगलाच लगाम लागला आहे. अनेकांनी स्वत:च्या घरातील शौचालयाचा वापर आता सुरू झाला आहे. ज्यांच्याकडे शौचालय नाही, त्यांना जिल्हा परिषदेंतर्गत पंचायत समिती मार्फत १२ हजार रूपये अनुदान देण्यासाठी तरतूद करण्यात आलेली आहे. 
 
दिग्रस तालुक्यात गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत यांच्या मार्गदर्शनात दि. १३ डिसेंबर २०१६ पासून गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती करण्यात आली. दररोज सकाळी ५:३० ते वाजेपर्यंत रस्त्यावर शौचास बसणाऱ्यांना समज देणे तसेच त्यांना घरात बांधून असलेल्या शौचालयाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. अनेकांचे शौचास आणलेले पाणी टमरेल उलटून देणे असे कार्य पंचायत समितीमार्फत सुरू केल्याने उघड्यावर शौचास बसणाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. 

पंचायत समितीच्या गुड मॉर्निंग पथकाच्या कारवाईच्या भितीमुळे ग्रामीण भागातील ज्यांनी शौचालयाचे बांधकाम केले, मात्र काही कारणास्तव त्याचा वापर करण्यात येत नव्हता तेसुद्धा आता आपल्या घरातील शौचालयाचा वापर करण्यास प्रवृत्त झाले आहेत. 

ज्यांचे नाव बेसलाईनमध्ये असेल तसेच वाढीव कुटुंब असल्यास, अल्पभूधारक, भूमिहीन मजूर यांना एमआरजीएसमधून घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी १२ हजार रुपये अनुदान देण्यात येते. या अनुदानामुळे अनेकांनी आपल्या घरामध्ये शौचालयाची निर्मिती केली मात्र तीचा वार करण्यात येत नव्हता तो आता सुरू झाला आहे. 

गुड मॉर्निंग पथकाची निर्मिती हागणदारीमुक्तीसाठी करण्यात आली आहे. या पथकामार्फत सध्या नागरिकांना योग्य सल्ला देऊन शौचालयाचा वापर करण्यासाठी मार्गदर्शन देण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्यावर शौचास बसण्यावर सध्या अंकुश लागला आहे. केंद्र राज्य शासनानेही आता ग्रामीण भाग हा निर्मलग्राम करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे उघड्यावर शौचास बसणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी आता गुड मॉर्निंग पथक तैनात करण्यात आले असून ते आता पूर्ण ताकदीने काम करत असल्याने परिणाम दिसत आहेत. 

गुड मॉर्निंग पथक गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, सहाय्यक गट विकास अधिकारी अमित राठोड यांच्या मार्गदर्शनात समूह समन्वयक मुकेश यादव, विस्तार अधिकारी सांख्यिकी रामेश्वर ढोले, कनिष्ठ सहाय्यक एस.के.गुल्हाने, ग्रामसेवक ए.जी.काजळे, एपीओ सहयोग महल्ले, सरपंच नितीन इंगोले आदी सहभाग नोंदवित आहे. 

लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी 
- गुडमॉर्निंग पथकाच्या माध्यमातून उघड्यावर शौचास बसू नये, असा समज देणे सुरू आहे. वारंवार समाजावून सांगितल्यानंतरही उघड्यावर शौचास बसल्यास हजार रूपये दंड, पोलिस अधिनियम नुसार कलम ११५(क), ११७(क) नुसार पोलिस कार्यवाही करण्यात येईल. सध्यातरी केवळ लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.’’
-राजनंदिनी भागवत, गटविकास अधिकारी, दिग्रस. 
बातम्या आणखी आहेत...