आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत फुटणार अाता ग्रा.पं.चे फटाके, 16 आॅक्टोबरला मतदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील २५५ सरपंचपदासाठी आॅक्टोबर रोजी मतदान होणार होते. परंतु, काही धार्मिक कार्यक्रमांमुळे या तारखेत बदल करण्यात आला असून, सुधारित कार्यक्रमानुसार ऐन दिवाळीच्या कालावधीत १६ आॅक्टोबर रोजी मतदान तर धनत्रयोदशीच्या दिवशी १७ आॅक्टोबर रोजी मतमाेजणी होणार आहे. 
 
उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ते आॅक्टाेबर या कालावधीत तुळजा भवानी शारदीय नवरात्र महोत्सवात मोठ्या संख्येत भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाकडे केली होती. त्याचप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात अमरावती जिल्ह्यात दुर्गा उत्सवासह मोहरमही मोठया प्रमाणात साजरा केला जात असतो. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी, अशी विनंती केली होती. या दोन्ही विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने उस्मानाबाद येथील १६५ अमरावती जिल्ह्यातील २६२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची आॅक्टोबर ही पूर्वीची तारीख रद्द करून नवी तारीख १६ आॅक्टोबर दिली आहे. 
 
याअंतर्गत नोटीस प्रसिद्धीची सुधारीत तारीख १४ सप्टेंबर असून नामांकन अर्ज मागवण्याचा सादर करण्याचा वेळ २२ ते २९ सप्टेंबर या कालवधीत स. ११ ते दु. ४.३० पर्यंत ठेवली आहे. नामांकन अर्जांची छाणनी आॅक्टोबर रोजी सकाळी ११ पासून सुरू होईल. 
बातम्या आणखी आहेत...