आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामसेविकेचे मंगळसूत्र हिसकावले दुचाकीवरून खाली पाडले; गुन्हा दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाभुळगाव- यवतमाळशहरातील चेन लिफ्टींगच्या घटना ताज्या असताना आता चोरट्यांनी ग्रामीण भागाला लक्ष करण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील पंचगव्हाण ग्राम पंचायतमध्ये कार्यरत ग्रामसेविका सारिका लक्ष्मण बनकर यांचेवर मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी हल्ला चढवत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना आज दि. १७ रोजी सकाळी ११.३० वाजता पिंप्री इजारा गावाजवळ घडली. ग्रामसेविका बनकर ह्या नेहमीप्रमाणे आपल्या एक्टिव्हा क्रमांक एमएच २९ -अेपी-१४२७ या वाहनाने कळंबहून पिंप्री इजारा मार्गे पंचगव्हाण येथे जात असताना पिंप्री गावानंतर अर्ध्या किलोमीटरवर काळ्या रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांना गाडीवरून खाली पाडले. मोटर सायकलवरील एकाने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. यावेळी झटापट झाल्याने अर्धे मंगळसूत्र ग्रॅम, किंमत अंदाजे दहा हजार रूपये घेऊन चोरटे पसार झाले. खाली पडल्याने बनकर यांना हाताला पायाला दुखापत झाली. घटनेची फिर्याद त्यांनी बाभुळगाव पोलिस स्टेशनला नांेदवली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.