आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांच्या खिशाला झटके, व्हॅट संपुष्टात येऊनही वस्तूंची अव्वा-चा-सव्वा दराने विक्री

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- वस्तू सेवा कराच्या (जीएसटी) नावावर ग्राहकांच्या खिशाला झटके बसत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. व्हॅट संपुष्टात अाल्यानंतर किंमती कमी होण्या ऐवजी अत्यल्प जीएसटी असलेल्या वस्तूंचे भाव अव्वा-चा-सव्वा वाढविण्याचा प्रकार शहरात समोर आला आहे. जीएसटीचा बागुलबुवा करीत ग्राहकांची लूट करण्याचा नवीन उद्योग शहरात सुरू झाल्याची चर्चा जनतेमध्ये होत आहे.
 
विविध कराच्या माध्यमातून होत असलेली जनतेची लूट थांबावी म्हणून संपूर्ण देशात वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. वस्तू सेवांवर लागणाऱ्या वर्तमानातील अनेक करांची जागा एक कर घेणार असल्याने सोपी कर व्यवस्था निर्माण होण्याचे संकेत देण्यात आले. कमी सुटसह सरळ कर व्यवस्था, देशभरात नियम, प्रक्रिया करदारांमध्ये एकरुपता तसेच वस्तू सेवांचे समान वर्गीकरण प्रणालीमुळे कर प्रबंधनात सुनिश्चितता येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. जास्तीत जास्त वस्तुंवर एक तर कर सुट किंवा फक्त टक्के कर आकारणी करण्याचे प्रस्तावित आहे.

जीएसटीपासून गरीब सामान्य जनतेला सर्वाधिक लाभ तसेच गरीबांना त्यांचा हक्क मिळणे सुनिश्चित होणार असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मात्र शहरात त्याउलट परिस्थिती निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. नवीन कर व्यवस्था लागू करण्यात आल्यानंतर सुट देण्यात आलेल्या किंवा अत्यल्प जीएसटी असलेल्या वस्तुंच्या दरात भरमसाठ वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. टक्के जीएसटी असलेल्या वस्तूंची तब्बल २० टक्के मनमानी कर आकारणी करीत शहरात विक्री करण्याचा प्रकार सुरु असल्याची माहिती आहे. एक राष्ट्र, एक कर, एक बाजाराचा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने एका नव्या भारताची निर्मिती करण्याचे स्वप्न पाहिले. मात्र या उद्देशाला तिलांजली देण्याचा प्रकार होत असल्याची बाब समोर आली आहे. प्रत्येक कुटुंबाला दैनंदिन वापरात उपयोगी असणाऱ्या वस्तुंवर अश्या प्रकारे अनावश्यक कर वाढ केली जात असल्याचा प्रकार शहरातील नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. एक कर असला अनेक विविधता असल्याने त्याचा लाभ घेत जीएसटीच्या माध्यमातून ग्राहकांची लूट होत असल्याची चर्चा आहे.
 
नियमानुसारदर कमी करावे : जीएसटीलागू झाल्यानंतर वस्तूंचे दर कमी झाले असतील तर नियमानुसार दर कमी करणे गरजेचे आहे. उत्पादनाच्या एमआरपीवर स्टीकर लावण्याचे अधिकार विक्रेत्याला नाही. नियमानुसार दैनंदिन वापराच्या वस्तुंचे दर कमी करणे गरजेचे आहे. दर कमी झाल्याने एमआरपीत फरक पडत असल्याने अनेक औषधी कंपनीला परत पाठविण्यात आल्या. त्यामुळे बाजारात औषधींचे देखील ३० ते ४० टक्के कमतरता आहे, असे महानगर चेम्बर ऑफ कामर्सचे अध्यक्ष सुरेश जैन यांनी ‘दिव्य मराठी ’शी बोलताना सांगितले.
 
तक्रार आल्यास कारवाई करू
वस्तूसेवाकर लागू झाल्यानंतर सद्यस्थितीत निरीक्षण स्थितीत आहे. कर आकारणी बाबत अद्याप अनेक बाबींची उकल झालेली नाही. जीएसटीमुळे कमी वस्तुंची दर वाढवून विक्री हाेत असेल तर लेखी तक्रार अाल्यास कारवाई होईल.
- सतीश लोहार, विक्री कर सहआयुक्त.

पुढील स्‍लाइडवर...खाण्‍यापिण्‍याचे पदार्थ स्‍वस्‍त...
बातम्या आणखी आहेत...