आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर हरिसालमध्ये डिजिटल इंडियाचा मार्ग झाला मोकळा, कोरकू भाषेतूनही शिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरिसाल, मेळघाट- जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेल्या हरिसाल या गावांत डिजिटल शिक्षण पद्धतीची यशस्वी चाचणी गुरूवारी घेण्यात आली. काही खासगी कंपनीच्या सहकार्याने ही चाचणी यशस्वी झाल्यामुळे आता या गावातील विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाचे धडे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच देशभरात हरिसाल हे गाव रोल मॉडेल म्हणून प्रस्तावित करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातून शिक्षणाच्या डिजिटायझेशनची सुरूवात करण्यासाठी जिल्ह्यातील हरिसाल हे गाव निवडण्यात आले आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी कैलाश घोडके, शिक्षणाधिकारी डाॅ. श्रीराम पानझडे, मायक्रोसॉफ्टचे भारतातील तांत्रिक प्रमुख प्रशांत शुक्ला यांच्या प्रमुख उपस्थितीत ही चाचणी झाली. यावेळी हेवलेट पॅकर्ड, चैतन्य सॉफ्टवेअर, एयर जल्दी या खासगी कंपन्यांचे तंत्रज्ञ देखील उपस्थित होते. दुर्गम गावात डिजिटल पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारची योजना अमरावती जिल्ह्यातील हरिसाल या गावात प्रत्यक्षात साकार होत आहे. जिल्ह्यातील धारणी तालुक्यात असलेल्या हरिसाल या लहानशा गावातील विद्यार्थ्यांना आता डिजिटल शिक्षण घेता येणार आहे.

ऑडिओ आणि व्हिडिओ मार्फत शिक्षण
लर्निंगक्लास मध्ये पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलांना ऑडिओ आणि व्हिडिओ मार्फत शिक्षण देण्यात येणार आहे. हरिसाल येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ऑडीयो व्हिडीओ शिक्षण देणारे संच बसवण्यात आले. पुणे येथील चैतन्य सॉफ्टवेअर ने हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या शिक्षण पद्धतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक फायदा होण्यास मदत होणार आहे. चैतन्यचे योगेश बाहेती आणि शिक्षणाधिकारी श्रीराम पानझाडे यांनी यावेळी क्लासरुमच्या उपयुक्ततेची प्रात्यक्षिक सादर केले. हरिसाल येथील अंगणवाडी केन्द्रात मायक्रोसॉफ़्ट्ने एलइडी स्क्रिन उपलब्ध करून दिली. या स्क्रिनच्या माध्यमातून हरिसालचे चिमुकले डिजिटल शिक्षण घेत आहेत. हेवलेट पॅकर्ड या कंपनीच्या सहकार्याने हरिसाल येथे डिजिटल क्लासरूम उभारण्यात आली आहे. या क्लासरूम मध्ये संगणकावर शिक्षण देण्यात येइल. ग्रामस्थांच्या सहभागातून येथे स्वानंदी उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांनी यावेळी दिली.

खासगी कंपन्यांचा सहभाग
देशातीलपहिले डिजिटल व्हिलेज म्हणून हरिसाल या गावाची निवड करण्यात आली. या गावात सुमारे विविध शासकीय यंत्रणा आणि विभागाकडून अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, भारत संचार निगम लि., आरोग्य विभाग, स्पेशालिटी हॉस्पिटल, एलव्ही प्रसाद आय केअर सेंटर, हैद्राबाद, शिक्षण विभाग,चैतन्य सॉफ्टवेअर, कृषी विभाग, व्हि ॲग्री हैद्रबाद, इंडूस टॉवर, स्कील डेव्हलपमेंट, जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सेतू, महा ऑनलाईन, पोस्ट ऑफिस, मेळघाट टायगर प्रोजेक्ट, एमआयडीसीस, धारणी प्रकल्प कार्यालय, सिडॅक, ब्रीटानिया या यंत्रणेमार्फत डिजिटल हरिसाल संकल्पनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
- ई लर्निंगसेंटरमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी आणि कोरकू या भाषेतून आठवी पर्यंतचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे. डिजिटल क्लासरुममुळे आता जगाशी संपर्क होणार आहे. किरणगित्ते, जिल्हाधिकारी,अमरावती.

- हरिसाल मुळेआता २० कि.मी.पर्यंतच्या ५० गावांत इंटरनेट सुविधा देणे शक्य होणार आहे. महिनाभरात ५० एमबीपीएस स्पिड होईल. १०० एमबीपीएस स्पिडचा मानस आहे. प्रशांतशुक्ला, तंत्रज्ञान प्रमुख, मायक्रोसॉफ्ट.

नागरी सेवा सुरू
महाराष्ट्र शासन आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या संयुक्त उपक्रमातून या गावात १८ ई-नागरी सुविधांपैकी ई-स्किल सेंटर, लर्निंग क्लासरुम, हेल्थ सेंटर, डिजिटल क्लासरुम, ऑनलाईन सेतु केंद्र, ग्रामपंचायत संग्राम केंद्र, क्लाऊड बेस लर्निंग या सेवा सुरु करण्यात आल्या.

स्किलमध्ये २१ प्रकारचे प्रशिक्षण
महाकौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत स्किल सेंटरमध्ये २१ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे महिलांना प्रशिक्षण देणारे मेळघाटातील हे पहिलेच प्रशिक्षण केंद्र ठरणा आहे. येथे ६० महिलांना प्रशिक्षण देण्यात येईल. हरिसाल परिसरातील १८ ते ३० वर्षे वयोगटातील सुमारे ६० हजार युवक युवतींना या केंद्राचा लाभ होणार आहे. या केंद्रातर्फे सुमारे ते अडीच हजार आदिवासी महिलांना प्रशिक्षित करण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...