आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिजुधावडीच्या आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृह पाण्यात, झेड्पीच्या सीईआेंना कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मेळघाटातील कुपोषण आरोग्य सुविधांचा विषय सातत्याने ऐरणीवर असतो. शासनाच्यावतीने या संवेदनशील भागाला सोयीसुविधा पुरवल्या जात असल्याचा नेहमीच दावा केला जातो. परंतु, वास्तवात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आरोग्य कर्मचाऱ्यांना आपल्या सेवा बजवाव्या लागत असल्याचेही भीषण वास्तव असून, याचा एक आदर्श नमुना धारणी तालुक्यातील बिजुधावडी येथील आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवासस्थान ठरले आहे. जि. प. प्रशासनाच्या डोळेझाक वृत्तीमुळे येथील निवास्थाने मागील चार वर्षांपासून गळत आहेत.
आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृहात पाणी साचले असून येथे प्रसूती कशी करावी असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. दरम्यान, यातील काही इमारतींच्या भींती शिकस्त झाल्यामुळे त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता येथील कर्मचाऱ्यांच्यावतीने व्यक्त केली जात आहे.

धारणी तालुक्यातील बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांसाठी एकूण नऊ निवासस्थाने आहेत. परंतु ही सर्व निवासस्थाने मागील चार वर्षांपासून गळत आहे. घरात पाणी गळू नये म्हणून कर्मचाऱ्यांना छतासह घरातील साहित्यांवरही प्लास्टीकचा वापर करावा लागत आहे. तुफान संततधार पावसामुळे भिंतीनाही कमालीचा ओलावा राहत आहे. छत गळत
असल्यामुळे कर्मचाऱ्यांना घरातील पाणी भांड्यांच्या मदतीने घराबाहेर फेकावे लागत आहे. या निवासस्थानामधील चालकाच्या निवासस्थानाची सर्वाधिक भयानक अवस्था आहे.

निवासस्थानाला छत असूनही घरातील सर्व साहित्यच प्लास्टिकने झाकून ठेवावे लागत आहे. मागील वर्षी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी आपले गाऱ्र्हाणे निवेदनाच्या स्वरुपात धारणी येथील गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाला कळवले होते. परंतु, त्यानंतरही प्रशासनाने याची दखल घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांना गळक्या निवासस्थानात राहून सेवा बजावावी लागत आहे. मागील चार वर्षांपासून येथील निवासस्थाने गळत असूनसुद्धा जिल्हा प्रशासनाच्यावतीने दुरूस्तीसाठी कोणतेच पाऊल उचलले जात नसल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने या संवेदनशील भागात सेवा कशी द्यावी असा सवाल कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. येथील आरोग्य केंद्रात मागील १९ वर्षांपासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ सेवा देत आहे. परंतु या कर्मचाऱ्याला हक्काचे निवासस्थानच नसल्यामुळे वाहनचालकाच्या निवासात दिवस काढावे लागत आहे.

खडीकरणासाठीनिधी, दुरूस्तीसाठी वाटाणे: विपरीतपरिस्थितीत सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान झोप तरी मिळून चांगली सेवा रुग्णांना मिळावी यासाठी निवासस्थान सुस्थितीत असणे गरजेचे आहे. परंतु येथील निवासस्थानाची दुरूस्ती सोडून जि. प. प्रशासनाने रुग्णालयात आवश्यकता नसताना संरक्षक भिंत, क्राॅक्रिटीकरण, खडीकरण पेव्हींग ब्लॉक बसवण्याचा कार्यक्रम हाती घेतल्याची तिखट प्रतिक्रिया येथील कर्मचाऱ्याने व्यक्त केली आहे.
बिजुधावडी येथीलआरोग्य केंद्रातील निवासस्थानाच्या दुरवस्थेबाबत मला माहिती नसून, याबाबत माहिती घेऊन सांगतो. -गिरीश कराळे, बांधकाम सभापती, जि. प. अमरावती.

प्रसूती कशी होईल
गरोदर माता बालमृत्यू टाळण्यासाठी शासनाच्यावतीने लाखभर प्रयत्न केले जात आहे. परंतु, बिजुधावडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रसूतीगृहात सध्या पाणी साचले असल्याचे कर्मचाऱ्यांनी नाव सांगण्याच्या अटीवर दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. अशा परिस्थितीत महिलेची प्रसूती कशी होईल असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेणार
^बिजुधावडीयेथीलकर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाची दुरूस्ती करण्यासाठी त्वरित बजेटमध्ये तरतूद करण्यात येईल लवकरच काम हाती घेतले जाईल. सुनीलपाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. अमरावती.

मुख्यालयाची सक्ती, पण सुविधांची बोंब
निवासस्थांच्या भिंती शिकस्त झाल्याने त्या केव्हाही कोसळू शकतात.कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती केली जाते. मात्र, राहण्यालायक सुविधा आहेत की नाहीत याचा कुणीही विचार करत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...