आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपुरातील हायटेन्शन वायरच्या 3 बळींची न्यायालयाकडून दखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नागपूर- उच्चदाब क्षमतेच्या वीज वाहिन्यांचा झटका लागून तीन मुलांचा बळी जाण्याच्या वेगवेगळ्या घटनांची गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली. कोर्टाने ऊर्जा व नगर विकास मंत्रालयासह वीज वितरण कंपनीला नाेटिसा बजावल्या. प्रत्येक घटनेबद्दल प्रत्येकी २५ हजारांची रक्कम उच्च न्यायालयात जमा करण्याचे निर्देश महावितरणला दिले आहेत.

नागपुरात मागील दोन दिवसांत दोन घटनांमध्ये तीन बालकांचा विजेच्या धक्क्याने बळी गेला. सुगतनगरात घराजवळून जाणाऱ्या उच्चदाब वाहिनीमुळे धक्का लागून जुळ्या भावंडांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेच्या पाठोपाठ हिंगणा परिसरात आणखी एका बालकाचा विजेच्या धक्क्याने बळी गेला. या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी उच्चदाब वाहिन्यांच्या खाली घरांचे बांधकाम केल्याने या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.  वीज वाहिन्या भूमिगत करण्याची घोषणा नागपूरचे पालकमंत्री असलेले ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. 
बातम्या आणखी आहेत...