आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिवरा आश्रम संमेलनही वादात; अंनिसचा विरोध, साहित्य संमेलनाच्या वादाची परंपरा कायम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- बुलडाणाजिल्ह्यातील हिवरा आश्रम येथील विवेकांनद आश्रम या संस्थेला ९१ वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा बहुमान मिळाला. मात्र, हे संमेलनही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी शुकदास महाराजांच्या हिवरा आश्रमात संमेलनाला विरोध असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेश चौबे यांनी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याचे सांगितले. 

मानव म्हणाले, हाजी मस्तानने गरिबांसाठी वैद्यकीय सेवा महिलांना बाळंतपणापासून सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. म्हणून त्याचे कौतुक करायचे का? तो स्मगलर असला तरी ग्रेट होता असे म्हणायचे का? हाजी मस्तान प्रामाणिक तरी होता. मी स्मगलर आहे, असे तो म्हणायचा. हा तर अप्रामाणिकपणाचा अर्क आहे. विवेकानंदांचे नाव घ्यायचे, संत असल्याचे ढोंग करायचे. स्वत:ला डाॅक्टर म्हणून प्रोजेक्ट करून कंपन्यांचा एजंट व्हायचे काम त्यांनी केले, असा आरोप त्यांनी केला. 
बातम्या आणखी आहेत...