आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीतील १६ मुले खेळणार वर्ल्डकप, विदर्भातील 6 जण भारतीय संघात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब मुलांनाही खेळाची हौस भागवता यावी यासाठी फुटबाॅलचा खास होमलेस वर्ल्डकप घेतला जातो. यंदा स्काॅटलंडच्या ग्लासगो शहरात येत्या १० ते १६ जुलै या काळात हा वर्ल्डकप होणार आहे. यासाठी देशभरातून मुले मुलींचा मिळून १६ खेळाडूंचा संघ निवडण्यात आला आहे. त्यात नागपुरातील चार, वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील एक आणि यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील एक अशा सहा जणांचा समावेश आहे.

अांतरराष्ट्रीय पातळीवरचा सामना खेळण्याची या मुलांच्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. फूटबाॅलचे एक प्रशिक्षण शिबिर घेण्यात आल्यानंतर ही मुले वर्ल्डकपसाठी स्काॅटलंडला रवाना झाली. या स्पर्धेत जगभरातील ६८ संघ सहभागी होणार आहेत. १६ जणांच्या संघात नागपुरातील दोन मुली आणि एक मुलगा आहे.

संघात चेन्नईचे साईराम लोगनाथन, रमेश सरवणन संगीता सेकर, कोलकात्याचे महंमद सद्दाम हुसैन, मीणा खातून, पाॅलोमी अधिकारी इप्शिता रॉय, भोपाळचा सोहन धुर्वे, नागपूरचे मोहंमद शहज़ाद, शुभम पाटील, निकिता गोर, ऐश्वर्या वाघ आकांक्षा शेलार, कोइमतूरचा प्रभार मलैयशन, दिल्लीचा शिवम, मुंबईची क्रिस्टीना फ्रांसिस असे खेळाडू आहेत. याशिवाय अक्षय माधवन, होमकांत सुरंदसे कोच म्हणून तर अभिजीत बारसे व्यवस्थापक म्हणून सोबत आहेत.

सूरज: आई धुणीभांडी करते, वडील शेतमजूर : सूरजचक्रेच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. आई चार घरी धुणी-भांडी करून किंवा मिळेल ते काम करून घर चालवते. वडील शेतमजूर आहेत. त्याला लहान भाऊ एक मोठी बहिण आहे. त्याच्या घरापासून दोन-तीन किमीवर स्लम साॅकरचे मैदान आहे. तिथे जाऊन तो फूटबाॅल खेळत असे. परत आल्यावर तो आधी नोकरी शोधणार आहे आणि शिकून त्याला प्रशिक्षक व्हायचे आहे.

ऐश्वर्या : हाफपँट, शर्ट घालणे घरी पसंत नव्हते
ऐश्वर्या वाघ हिचे वडील खासगी ड्रायव्हर आई गृहिणी अाहे. तिला दोन भाऊ आहेत. मुलीचे हाफ पँट शाॅर्ट््स घालून फुटबाॅल खेळणे घरी मान्य नव्हते. पुढे विरोध मावळला. भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न.

आकांक्षा : बूटघ्यायला पैसे नव्हते, कोचचे स्वप्न
आकांक्षा डोलारे गोलकीपर. आई गॅस एजन्सीत शिपाई. वडील नाहीत. दोन मोठ्या एक लहान बहिणी. बूट घ्यायला पैसे नव्हते. आयटीआयमध्ये डिझेल मेकॅनिकचा कोर्स करते. कोच व्हायचे आहे.

शुभम : संघटना,कोचकडे खर्चभार
नागपूरचाशुभमपाटील स्ट्रायकर आहे. बोखारा येथील शुभम बी.ए. फर्स्ट इयरला असून, आई-वडील मजुरी करतात. त्याला एक लहान भाऊ आहे. घरची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी अडवले नाही. प्रशिक्षक उमेश देशमुख स्लम साॅकर संघटना त्याचा खर्च उचलतात.
बातम्या आणखी आहेत...