आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज आजपासून, ३१ ऑगस्टपर्यंत सादर करता येणार अर्ज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- महाराष्ट्रराज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०१६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे ऑनलाइन अर्ज साेमवार, १७ ऑगस्टपासून भरता येणार आहे. उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे.

अमरावती विभागीय शिक्षण मंडळ अंतर्गत विभागातील विविध केंद्रांवर परीक्षा घेतली जाते. बारावीच्या परीक्षेत प्रविष्ट होता यावे, म्हणून १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०१५ दरम्यान, ऑनलाइन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. परीक्षा अर्ज ऑनलाइन प्रणालीने सादर केल्यानंतर मंगळवार, सप्टेंबर ते शनिवार सप्टेंबरदरम्यान उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना चलनाद्वारे बँकेत परीक्षा शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात संपर्क करावा लागणार आहे. परीक्षा शुल्क चलानद्वारे बँक ऑफ इंडियामध्ये शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना भरावे लागणार अाहे. शिवाय शुल्क भरण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या याद्या अमरावती विभागीय बोर्डाकडे सादर कराव्या लागणार आहे. ऑनलाइन परीक्षा अर्जामध्ये आधार क्रमांकाबाबत नव्याने जागा करण्यात आली आहे. आधार क्रमांक उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांनी अर्जात तो भरावा लागणार आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक नाही, त्यांच्याकरिता भरणे बंधनकारक नसल्याचेदेखील स्पष्ट करण्यात आले आहे.