आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला ठार करून पतीची गळफास लावून आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- घरगुती वादातून पत्नीला चाकूचे घाव घालून ठार केल्यावर पतीने झाडाला दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना येथील एमआयडीसी परिसरात मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दाम्पत्याची नावे बबीता (वय ५५) आणि रामदास सुकळकर (वय ६०) अशी होती.
 
पती-पत्नीमध्ये सातत्याने वाद होत असल्याने सात वर्षांपासून ते वेगळेच राहात होते. रामदास हा त्याच्या मोठ्या तर बबिता ही लहान मुलाकडे राहात होती. मात्र, तरीही दोघांची नियमित भेट व्हायची. सोमवारी रात्री रामदास हा बबीताला घेऊन बाहेर गेला तेथे भांडण झाल्यावर रामदासने बबीतावर चाकूने वार करून तिला ठार केले. त्यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. 
 
बातम्या आणखी आहेत...