आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परतवाडा: अवैध दारू विक्रेत्याच्या घरी सापडले बारा लाखांचे घबाड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दीपक लोंदेच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा. - Divya Marathi
दीपक लोंदेच्या घरातून पोलिसांनी जप्त केलेल्या नोटा.
परतवाडा- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देश जिल्हा प्रशानाच्या आदेशावरून बहुतांश दारूची ‘झाकणं’ बंद झाल्याने अवैध दारू धंद्याला ‘बरकत’ आल्याचे चित्र दिसून येत आहे. याचाच परिणाम म्हणून दारूच्या दुकानात काम करणारा नोकर दीपक लोंदे (वय ४२) या नोकराने दुकान बंद झाल्यामुळे तीन महिन्यांपूर्वी नोकरी सोडून अवैध व्यवसाय थाटला. 

शहरातील बुनकरपुऱ्यातील रहिवाशी असलेला दीपक ‘विशेष’ पुरवठादार झाल्याची कुणकुण पोलिसांना लागताच धाड टाकली असता दोन हजार रुपयांच्या कोऱ्या नोटांचे बारा लाख रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. ही कारवाई पोलिसांनी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास केली. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य राष्ट्रीय महामार्गावरील दारूची बहुतांश दुकानदारी बंद झाली आहे. त्यातच जनमताचा रेटा वाढल्याने शहरासह गावपातळीवरीलही बहुतांश दुकानांना कुलुपे लागली आहेत. परंतु तळीराम शौक भागविण्यासाठी अव्वाच्या सव्वा दराने मिळेल त्या मार्गाने दारू मिळवत असल्याने तालुक्यात सध्या अवैध दारू विक्रेत्यांच्या व्यवसायाला चांगलीच बरकत आल्याचे चित्र दिसून येत आहे. याचा उत्कृष्ठ नमुना शहरातील बुनकरपुऱ्यात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला आहे. 

बुनकरापुऱ्यातील रहिवाशी असलेला दीपक गोपाळराव लोंदे हा अवैध दारू व्यवसाय करीत असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. संशयाच्या आधारावरून पोलिसांनी लोंदे याला त्याच्या अॅक्टिव्हा दुचाकीसह ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून अंदाजे दोन हजार रुपये किंमतीच्या सहा इंग्रजी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. पाच लीटर गावठी दारू पाच हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पोलिसांना घरातही दारूचा संशय आल्याने त्याच्या घराची तपासणी केली. कपाटाची पाहणी केली असता त्यांंना १२ लाख रुपयांची रोकड आढळून आली. ही सर्व रक्कम नवीन दोन हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरुपात होती. पोलिसांनी ती रोकड ताब्यात घेऊन त्याबाबत विचारणा केली असता आपण ढेपीचा व्यवसाय करीत असून गोडावून असल्याचे दीपकने पोलिसांना सांगितले. मात्र त्याबाबत कोणतेही पुरावे दीपकला सादर करता आले नाही. वेळोवेळी त्याच्या बयाणातही विसंगती आढळून येत होती. पोलिसांनी ती रक्कम ताब्यात घेतली. 

दीपकच्या विरोधात पोलिसांनी अवैध दारूची विक्रीचा गुन्हा नोदंवला असून १२ लाख रुपयांच्या रकमेबाबत सीआर १०२ अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार संजय सोळंके यांच्या मार्गदर्शनात डीबी स्कॉडचे मनोज पंडीत, शिवा आठवले, विखे आदींनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ लक्ष रुपयांबाबत आयकर विभागाला पत्र देऊन माहिती मागविण्यात आली आहे. 

दरम्यान, दीपक लोंदे याची गुरुवारी (दि. २२) जामिनावर सुटका करण्यात आली. दरम्यान दीपकने अवैध धंदा सुरू केल्यानंतर विक्रीसाठी दारू कोठून आणली याचा तपास मात्र अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसून येत आहे. 

आयकर विभागाला दिली माहिती 
पोलिसांना अवैधदारू विक्रीबाबत माहिती मिळाली होती. मात्र तपासात मोठी रक्कम आढळून आल्याने ती ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी आयकर विभागाला माहिती दिली. इतकी रक्कम कुठून आली याचा शोध सुरू आहे. 
- संजय सोळंके, ठाणेदार 

कुतुहल कायम 
दीपकलोंदे हा दारू व्यावसायिक प्रकाश जयस्वाल यांच्याकडे कार्यरत होता. मात्र तीन महिन्यांपुर्वीच त्याने ती नोकरी सोडून दिली. दरम्यान दारूची वाढती मागणी लक्षात घेवून ग्राहक पुरवठादारांशी असलेल्या संबंधाचा फायदा घेऊन दीपकने अवैध दारूचा व्यवसाय सुरू केला. या अंतर्गंत शहरातील खास मद्यपींना महागड्या दारूचा पुरवठा करून सामान्य ग्राहकांना देशी गावठी दारू पुरवण्याचेही काम दीपकने सुरू केले होते. त्यामुळे उच्चभ्रू गरजूंचा दीपक पुरवठादार झाला होता. त्यामुळे दीपककडे बारा लाख रुपयांची रोकड आली कुठून याचा शोध सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...