आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये 43 हजार रुपयांची गावठी दारू जप्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- रविवारपासून(दि. १९) सलग तीन दिवस ‘ड्राय डे’ आहे. त्यामुळे राजूरा गावाजवळ असलेल्या मजीप्राच्या जलशुध्दीकरण केन्द्राच्या भितींलगत मोठ्या प्रमाणात गावठी दारु तसेच साहित्य असल्याची माहिती फ्रेजरपुराचे पीएसआय भगवान कोळी त्यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने रविवारी सकाळी वाजता या भागात शोध घेतला असता जमिनीत गाळून ठेवलेले दारुचे पिंप सडवा मिळून आला. यावेळी पोलिस पथकाने जवळपास १३० लीटर तयार दारू ४३० लीटर मोहाचा सडवा शोधून नष्ट केला आहे. पोलिसांनी जप्त नष्ट केलेल्या दारू सळव्याची किंमत ४३ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पीएसआय कोळी, पीएसआय जितेन्द्र ठाकूर, एएसआय गजानन डोईफोडे, मदन राठोड, विनोद माहुरे, रवि देशमुख, अशोक बंुदेले, राजु सायगन, दीपक पवार, वचन पंडीत यांनी केली आहे. 
बातम्या आणखी आहेत...