आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 वर्षे खैरलांजीची: असे घडले होते अवघ्या देशाला हादरवणारे निर्घृण हत्याकांड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूरपासून जवळच असलेल्या भंडारा जिल्ह्यातील खैरलांजी गावात घडलेल्या हत्याकांड प्रकरणाला आज दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या या प्रकरणात एका दलित कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्येपूर्वी दोन पीडितांवर सामुहिक बलात्कार झाल्याचेही समोर आले होते.
या हत्याकांड प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने सहा आरोपींना फाशी आणि दोघांना जन्मठेप सुनावली होती. मात्र हायकोर्टात या निर्णयात बदल झाला. हायकोर्टाने फाशी रद्द करत सर्व आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. सध्या या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. सुरेखा भोतमांगे, प्रियंका भोतमांगे, रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे या चौघांची हत्या करण्यात आली होती. सुरेखा यांचे पती म्हणजेत प्रियंका आणि रोशन, सुधीर यांचे वडिल हे एकटे या हत्याकांडातू बचावले होते. आजही सुप्रीम कोर्टात ते लढा देत आहेत.

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय होती नेमकी खैरलांजीतील घटना...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...