आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मोदीजी, विदर्भ राज्याची घाेषणा हीच बाबासाहेबांना अादरांजली’; अांदाेलन समितीची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘विदर्भाचे वेगळे राज्य व्हावे ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारच्या नागपूर दौऱ्यात विदर्भ राज्याबाबत घोषणा करावी, हीच अांबेडकरांना खरी अादरांजली ठरेल,’ अशी मागणी करणारे हजारो ई -मेल विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहेत.   

डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२५ व्या जयंती साेहळ्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र माेदी शुक्रवारी नागपुरात येत अाहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विदर्भ राज्य अांदाेलन समितीने अापली मागणी रेटून धरली अाहे.

‘भाजपच्या भुवनेश्वर येथील राष्ट्रीय अधिवेशनात विदर्भ राज्याचा ठराव संमत झाला होता. विदर्भातील प्रमुख भाजप नेत्यांनी स्वतंत्र राज्याचे आश्वासन देताना त्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. त्यामुळे विदर्भातून भाजपचे ४४ अामदार निवडून आलेत. मात्र, केंद्र आणि राज्यात भाजपची सत्ता आली असताना भाजपचे नेते  आश्वासन विसरले आहेत. त्यामुळे विदर्भाच्या जनतेची घोर निराशा झाली आहे. 

विदर्भाचे राज्य व्हावे, ही बाबासाहेबांची इच्छा होती. त्यामुळे दीक्षाभूमीवर त्यांना अभिवादन करण्यासाठी येताना विदर्भाची घोषणा करावी. हीच बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे’, असे साकडे समितीने माेदींनी घातले अाहे. अशी मागणी करणारे हजारो ई-मेल समितीच्या वतीने ११ एप्रिलपासून मोदींना पाठवण्यात आले आहेत. तसेच गुरुवारीही मोदींना याच मागणीचे मोठ्या प्रमाणात मेल पाठवण्यासाठी समितीने शहराच्या काही भागात व्यवस्था केली होती.   

चर्चेसाठी वेळ मागितली   
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदर्भ राज्याच्या मागणीवर चर्चेसाठी भेटीची वेळ मागितली आहे. त्याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. अद्याप तरी पंतप्रधानांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याची माहिती समितीने दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज दीक्षाभूमीवर वंदन
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनानिमित्त दीक्षाभूमीवर वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी नागपुरात येत अाहेत. या निमित्ताने उपराजधानीत विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले अाहे. सकाळी १०.४५ वाजता वायुदलाच्या विशेष विमानाने त्यांचे आगमन होईल. 

सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दीक्षाभूमीत अायाेजित कार्यक्रमास त्यांची उपस्थिती राहील.  तेथील पवित्र स्तुपास भेट देऊन ते आदरांजली अर्पण करतील.  त्यानंतर सकाळी ११.४५ ते १२ दरम्यान कोराडी थर्मल पॉवर स्टेशनचे उद‌्‌्घाटन माेदींच्या हस्ते हाेईल. दुपारी १२.२५ वाजता  मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित शासनाच्या विविध प्रकल्पाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल. या वेळी डिजिधन मेळाव्याचा समारोप होईल.  

या वेळी डिजिटल व्यवहारांना प्राेत्साहन देण्यासाठी अायाेजित स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण केले जाईल. तसेच डॉ. आंबेडकरांची दीक्षाभूमी’ हे विशेष टपाल तिकीट पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येईल. यानंतर माेदी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...