आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय किसान संघाने केले धरणे आंदोलन, सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणांचा केला निषेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धरणे आंदोलनात बोलताना नाना आखरे. - Divya Marathi
धरणे आंदोलनात बोलताना नाना आखरे.
नागपूर- संघ परिवारातील विदर्भ प्रांत भारतीय किसान संघाने बुधवार मार्चला स्थानिक संविधान चौकात धरणे आंदोलन करून सरकारच्या धोरणांचा निषेध केला. किसान संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष नाना आखरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी धरणे देऊन शेतकऱ्याला ‘भीक नको भाव पाहिजे’ हे ठणकावून सांगितले.
 
शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्के नफा धरून भाव देण्यात यावा तसेच शेतमालाला घसघशीत बोनस देण्यात यावा या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दोन वर्षांपूर्वी देण्यात आले. परंतु मुख्यमंत्री कार्यालयाकडून या बाबत नकारात्मक उत्तर आले. दोन वर्षांपासून आपल्याच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असे काम केलेले नाही अशी खंत नाना आखरे यांनी व्यक्त केली. 
 
शेतमालाच्या आयात-निर्यात धोरणात बदल करण्यात यावा, शेतमालाचे हमी भाव ठरवण्याची पद्धत बदलण्यात यावी, आदी मागण्या आखरे यांनी केल्या. यावेळी कार्यकारिणी सदस्य प्रा. मनोहर बुटे, कार्यालयीन मंत्री अजय बोंदरे आदींची समयोचित भाषणे झाली. 
 
बातम्या आणखी आहेत...