आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेकडून 7 व 8 जाने.ला इच्छूकांच्या मुलाखती, ना. राठोड, खा. गवळी, आ. सावंत घेणार मुलाखती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती येत्या जोनवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. स्थानिक बालकृष्ण मंगलम, आर्णी रोड येथे महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी, शिवसेना उपनेते आ. तानाजी सावंत जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार सर्व उच्चाधिकार समिती सदस्यांच्या उपस्थितीत या मुलाखती होणार आहेत. 
 
शनिवार दि. जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता या मुलाखती प्रारंभ होणार आहे. यात यवतमाळ, दारव्हा, दिग्रस, नेर, पुसद, उमरखेड, महागाव, बाभूळगाव तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती होतील. दुसऱ्या दिवशी रविवार दि. जोनवारी रोजी सकाळी ११ वाजता आर्णी, घाटंजी, पांढरकवडा, कळंब, वणी, झरी, मारेगाव, राळेगाव तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत. शिवसेनेकडून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीसाठी उमेदवारी हवी असलेल्या सर्व इच्छुकांनी उमेदवारी आवेदन पत्र छायाचित्रासह भरून आणणे आवश्यक आहे. इच्छुकांना हे आवेदनपत्र शिवसेना तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांच्याजवळ तसेच मुलाखतीच्या ठिकाणीसुद्धा मिळतील. प्रत्येक तालुक्याच्या मुलाखतीसाठी त्या-त्या भागातील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख तालुका प्रमुखांनी सुद्धा उपस्थित राहणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आपल्या तालुक्याच्या वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर संतोष ढवळे यांनी केले आहे. 

मुलाखतींपूर्वी होणार आढावा बैठक 
दि. जानेवारीला या मुलाखंतीपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य २३ जानेवारीला होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन येत्या जि. प. निवडणुकीत शिवसेनेच्या भूमिके विषयी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी शिवसेनेच्या सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, शाखाप्रमुख उपशाखा प्रमुखांनी तालुकानिहाय कार्यक्रमानुसार दिलेल्या तारखेला उपस्थित राहावे तसेच मुलाखत देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह उपस्थित राहावे, असे आवाहनही शिवसेना जिल्हाप्रमुखांनी केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...