आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘बालमृत्यू थांबवण्यासाठी पेसा कायद्याची अंमलबजावणी करा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मेळघाटातील बेरोजगारी, कुपोषण, स्थलांतरण मातामृत्यू, बालमृत्यू थांबवण्यासाठी १९९६ च्या पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशी मागणी मेळघाट आदिवासी विद्यार्थी युवा संघटनेने राज्यपालांकडे केली आहे. यासंदर्भातील निवेदन संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ३१ जुलै २०१४ च्या परिपत्रकान्वये अनुसूचित क्षेत्रातील १२ संवर्गातील सर्व रिक्त पदे स्थानिक अनुसूचित उमेदवारांमधून भरण्याबाबत सूचना नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आली होती. परंतु, एक वर्षाचा कालावधी लोटूनही संबंधित विभागाने कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे मेळघाटातील १२ संवर्गांशी संबंधित शासन अादेशानुसार सन २०१५-१६ मध्ये २० % कर्मचाऱ्यांची बदली करण्याची मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

-२००३-०४ मध्ये जिल्हा परिषदअंतर्गत कोरकू बोलीभाषेवर लागलेल्या २७३ बाेगस िशक्षकांची बदली करण्यात यावी.
-पेसा कायद्यांतर्गत मेळघाटातील अनु.जमाती क्षेत्रासाठी आदिवासी उपाययोजनांतर्गत ५% निधी थेट ग्रामपंचायतींना तत्काळ देण्यात यावा.
-मेळघाटात कार्यरत स्थानिक आदिवासी कर्मचारी कंत्राटी एएनएम, जीएनएम, ड्रायव्हर, कॉन्सिलर, शिक्षक तसेच वर्ग वर्ग च्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे.
-धारणी पंचायत समितीअंतर्गत ग्रामविकास निधीचे लॅम्प खरेदी प्रक्रियेत अनियमितता भ्रष्टाचार करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात यावे.
-अमरावती हे विभागीय मुख्यालय असल्याने अनुसूचित जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी साधारण एक हजार क्षमतेचे वसतिगृह बांधावे किंवा ते उपलब्ध करून द्यावे आदींसह विविध मागण्या या निवेदनात करण्यात आल्या अआहेत.