आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तार कुंपणामुळे एका वाघिणीच्या गळ्यावर झाली गंभीर जखम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - पांढरकवडा-घाटंजी परिसरामधील टिपेश्वर अभयारण्यातील एक वाघीण तार कुंपणामुळे जखमी झाली. विशेष म्हणजे यातून वाघीण बाहेर पडली. मात्र तार कुंपणामुळे तिच्या गळ्याला जखम झाली. हा प्रकार अभयारण्यातील एका ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानंतर वनविभागाने पावले उचलली. दरम्यान, नागपूरच्या पथकाने शनिवार, मार्च रोजी या घटनेबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर केला आहे. 
 
पांढरकवडा - घाटंजी तालुक्यातील अंदाजे १५ हजार हेक्टरमध्ये विस्तारलेल्या टिपेश्वर अभयारण्यातील वाघाची संख्या कमालीची वाढली आहे. अशा परिस्थितीत गेल्या वर्षभरात विविध प्रकारच्या घटनांमुळे केळापूर-घाटंजी तालुक्यातील नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. परिणामी, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीला तार कुंपण केले. अशात अभयारण्यातून आलेले प्राणी तार कुंपणात अडकून जखमी झाले आहे. 
 
मागील आठवड्यात एक वाघीण तार कुंपणात अडकली होती. दरम्यान, तार कुंपणातून बाहेर पडण्यात तिला यश आले असले, तरी तिच्या गळ्याला गंभीर जखम झाली. ही वाघीण तशाच अवस्थेत अभयारण्यात वावरत होती. याची माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर नागपूर कार्यालयास पुढील कार्यवाहीसाठी सुचवले होते. अशात चार ते पाच दिवसांपूर्वी वाघीण अभयारण्यातील ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये कैद झाली.
 
 दरम्यान, ट्रॅन्क्युलायझरने वाघास बेशुद्ध करून त्यावर उपचार करणारी चमू अभयारण्यात फिरत होती. शेवटी शनिवार, मार्च रोजी परिसरात वाघीण आढळून आली. वाघिणीला झालेल्या जखमांची पाहणी नागपूरच्या पथकाने केली असून, कुंपणामधील काही तीक्ष्ण वस्तूमुळे ही जखम झाल्याचे समोर आले आहे. आता हा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली आहे. विशेष म्हणजे वाघीणीची शिकार झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम मिळाला. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...