आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळच्या हिंसाचाराचा अंबानगरीत तीव्र निषेध, लोकाधिकार मंचचे राजकमल चौकात धरणे आंदोलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- केरळ येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून होत असलेल्या हिंसाचाराविरोधात स्थानिक राजकमल चौकात बुधवारी (दि. मार्च) सायंकाळी धिक्कार सभा घेण्यात आली. राष्ट्रवादी भावनेने प्रेरीत कार्यकर्त्यांच्या होत असलेल्या हत्यांबाबत निषेध व्यक्त करीत लोकाधिकार मंचने धरणे दिले. 
 
केरळ राज्यात मे २०१६ मध्ये सत्तेत अाल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांवर हिंसक हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. केरळमध्ये लोकशाही तसेच मानव विरोधी नरसंहार करणारे हल्ले वाढले आहे. सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गृह विभाग त्यांच्याकडे ठेवला असून पोलिस प्रमुखाला बाहेरचा रास्ता दाखविला असल्याचे लोकाधिकार मंचचे म्हणणे आहे. 
 
 
मुख्यमंत्र्यांचे संरक्षण असल्याने माकपाकडून वैचारिक विरोध असलेल्या कार्यकर्त्यांचे खून करण्याच्या वाढत्या घटनांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण राज्यात भययुक्त वातावरण निर्माण झाले आहे.
 
२८ डिसेंबर १६ ला माकप कार्यकर्त्यांनी भाजप कार्यकर्त्याच्या घराला आग लावली. ज्यामध्ये राधाकृष्णन आणि त्यांची पत्नी विमला यांचा मृत्यू झाला. १९ डिसेंबर २०१६ ला तिरुवनंतपूरम् येथे ४६ वर्षीय अनिल कुमार यांची हत्या करण्यात आली.
 
१२ ऑक्टोबर २०१६ ला कन्नूर येथे पियारानी येथील २६ वर्षीय रेमिथ उथमन यांची हत्या करण्यात आली. ऑक्टोबर १६ रोजी १९ वर्षीय श्री विष्णू, सप्टेंबर १६ ला कन्नूर येथील रामचंद्रन, ११ जुलै १६ ला इरीती येथील के. के. रामचंद्रन, २२ मे १६ रोजी प्रमोद यांची हत्या करण्यात आल्याचे मंचचे म्हणणे आहे.
 
या विरोधात राजकमल चौकात धरणे देण्यात आले.चंद्रकांत खानझोडे यांनी प्रास्ताविकतर संचालन सुधीर बोपुलकर यांनी केले. सभेला रास्वसंघाचे शिवा पिंपळकर, शैलेश पोतदार, जिल्हा कार्यवाह दत्तात्रय रत्नपारखी, नगर कार्यवाह संजय गुळवे, विहिंपचे गौरक्षा प्रमुख विजय शर्मा, यावेळी संयोजक अशोकसेठ बरेसीया, सहसंयोजक नरेंद्र करेसीया, शंकरसेठ पमनानी, अॅड. सुनील मिश्रा, अॅड. चंद्रशेखर डोरले, अॅड. राजेंद्र पांडे, रामूसेठ आहुजा, अमृत पटेल, गुलाब साहू, राजा नांगलिया, सुभाष राठी, नंदकिशोर अग्रवाल, अनिलसेठ डेंबला, डॉ. सुलभा रोंघे, अॅड. राजेश मुंधडा, डॉ. अनिल रोहनकर, अॅड. सुषमा भट, प्रवीण श्रीरामवार, राजू संतोषीया, अॅड. जयंत देव, प्राची पालकर, नंदकिशोर गांधी, भाजपाचे नवनिर्वाचित नगरसेवक संजय नरवणे, विजय वानखडे, आशिष अतकरे, विवेक कलोती, अजय सारसकर, राजेश साहू, प्रणीत सोनी, लविना हर्षे, संध्या टिकले, सुरेखा लुंगारे, संगीता बुरंगे, स्वाती कुळकर्णी, राधा कुरील, पद्मजा कौंडण्य तसेच श्याम नीळकरी, भाईजी मेहर, नानाजी गोरे, स्वप्निल पोतदार, मंगेश महाजन, रवींद्र देशपांडे, विशाल कुळकर्णी, अरविंद कडबे, गजानन भोपे, सागर जामकर, अशोक पांडे, राजेश गुप्ता, महेश देवळे, पवन जयस्वाल, प्रभाकर थेटे, राजा खारकर, अभय बपोरीकर, सागर खेडकर, किशोर आष्टीकर, प्रशांत जाधव, राहुल वाठोडकर, लक्ष्मीकांत शांडिल्य, पराग कुळकर्णी, जयेश भडके, प्राची पालकर, सुधा तिवारी, रिता मोकलकर, अलका सप्रे, छाया खंगाळे, उन्नती शालिग्राम, अखिलेश भारतीय, सौरभ लांडगे, अभय सूर्यवंशी, प्रतिक बिडकर, सुनील तिप्पट, सुनील पाठक, राजू देव, जयंत बेलोरकर, विरेंद्र कलकोटवार, प्रशांत देशपांडे, मयुर दोडके, सतीश करेसीया, आकाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 
बातम्या आणखी आहेत...