आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेना पदाधिकाऱ्याच्या मुलाचे केले अपहरण, निवडणूक लढवण्यासाठी दिली होती धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शिवसेनेच्यामहिला जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका वर्षा भोयर यांच्या आवेश नामक २० वर्षीय मुलाचे अपहरण केल्याची घटना शुक्रवारी (दि. ३) घडली होती. निवडणूक लढवता त्याच प्रभागाची शिवसेनेची उमेदवारी मिळावी, म्हणून एका महिलेने तीचा मुलगा त्याच्या मित्राच्या सहकार्याने या मुलाचे अपहरण केल्याची तक्रार वर्षा भोयर यांनी रविवारी (दि. ५) फ्रेजरपुरा पोलिसात दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित महिलेसह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच भोयर यांच्या मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका करण्यात आली आहे. 

याबाबत प्राप्त माहितीनुसार, वर्षा भोयर या शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख आहे. त्यांनी एसआरपीएफ प्रभागातून शिवसेनेकडून उमेदवारी मागितली होती. त्यांना पक्षाने उमेदवारी देण्याचे मान्य केले होते. दरम्यान शुक्रवारी (दि. ३) पक्षाकडून उमेदवारी घोषित करून एबी फॉर्म वितरीत करण्यात येणार होते. त्याच दिवशी सकाळी वाजताच्या सुमारास भोयर यांच्या घरी एक महिला तीचा मुलगा पोहचला. ही महिलासुद्धा त्याच प्रभागातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होती. मात्र पक्षाने वर्षा भोयर यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवू नका, असे त्या महिलेने भोयर यांना म्हटले मात्र भोयर यांनी नकार दिला तर त्या महिलेने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. याचवेळी त्या महिलेच्या मुलाने भोयर यांचा २० वर्षीय मुलगा आवेश याला बाहेर बोलावून नास्ता कुठे मिळतो, असे विचारून अनोळखी दोन व्यक्तीच्या दुचाकीवर बसवून आदिवासी कॉलनीत आणले. 

दुसरीकडे वर्षा भोयर ह्या खासदारांच्या निवासस्थानी पोहचल्या. एबी फॉर्म घेऊन त्या अर्ज भरण्यासाठी गेल्या. त्यावेळी या महिलेने पुन्हा धमकी दिली, तुझा मुलगा सुरक्षितपणे घरी पोहचून जाईल, तू उमेदवारी भरू नको, मात्र भोयर यांनी नकार दिला तर पुन्हा शिवीगाळ केली. त्यानंतर साडेतीन वाजता आवेश घरी पोहचला. त्याने आल्यानंतर सांगितले कि, त्या महिलेच्या मुलाने त्याच्या मित्राने आदिवासी कॉलनीतील एका खोलीत डांबून ठेवले होते, त्यानंतर दुचाकीवर कोंडेश्वर, मलखेड भागात नेले होते. यावेळी मारहाण केल्याचेही त्याने वर्षा भोयर यांना सांगितले होते. या प्रकारामुळे रविवारी भोयर त्यांनी फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सदर महिला, तीचा मुलगा इतर चार अशा सहा जणांविरुध्द अपहरण करणे, डांबुन ठेवणे, शिवीगाळ, मारहाण करणे,धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकाराने शहरातील राजकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

सध्या महापालिका जिल्हा परिषद, पंचायत समितीचा माहोल गरम झाला आहे. पक्षाचे तिकिट मिळावे म्हणून इच्छूक साम, दाम, दंड, भेद सर्व प्रकारचे हातखंडे आजमावत असल्याचे या प्रकारातून दिसून आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...