आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूबंदीसाठी मुलीच्या हंबरड्याने खडसे पेचात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - आज काल कोणी कोणाचे नाही.. कोणतंही सरकार काही करीत नाही.. अशा भावना व्यक्त करत बुधवारी एका मुलीने दारूबंदीच्या मागणीसाठी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यासमाेर हंबरडाच फाेडला. तेव्हा विधिमंडळ परिसरात उपस्थित असलेले सारेच अवाक् झाले.

दिवसभरातील सभागृहाच्या कामकाजाविषयी इलेक्ट्रॉनिक्स प्रसारमाध्यमांना बाइट देऊन सायंकाळी पाचच्या सुमारास खडसे निघाले असता ही मुलगी खडसे यांना भेटली. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी करा या मागणीकरिता शेकडोंच्या संख्यने महिलांचा मोर्चा विधान भवनावर बुधवारी धडकला. या मोर्चातील काही महिला विधिमंडळ परिसरात एकनाथ खडसे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. या महिलांसोबतच ही मुलगीही होती.
लाल दिव्याच्या गाडीत बसून जाणारी ही व्यक्ती सरकारमधील कोणीतरी वजनदार व्यक्ती आहेत हे या मुलीने हेरलं आणि लगेचच तिने रडण्यास सुरुवात केली. खडसेंपुढे या बालिकेने दारूमुळे हाेणाऱ्या दु:खाचा पाढा वाचत हंबरडाच फाेडला. यवतमाळ जिल्ह्यात गावागावांत सुरू असलेल्या मद्यविक्रीमुळे या मुलीला आणि तिच्या आईसारख्या कित्येक महिलांना किती जाच सहन करावा लागतो याची आपबीती तिने खडसेंपुढे कथन केली.
या वेळी विधिमंडळ परिसरात उपस्थित असलेल लोकंही काही काळासाठी भावनाविवश झाले होते. आता या मुलीला नेमके काय उत्तर द्यावे या पेचात महसूलमंत्री सापडले होते. तिची समजूत काढून मंत्रिमहोदयांनीही काढता
पाय घेतला.
बातम्या आणखी आहेत...