आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

17 मिनिटांत पोहोचले विमानात यकृत, अमरावती विभागात प्रथमच झाले अवयवदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावती विभागात प्रथमच अवयव दान झाल्यानंतर ठराविक वेळेच्या आत ते गरजू रुग्णापर्यंत पोहोचवणे आवश्यक होते. यासाठी डाॅक्टर्स, समन्वयक आणि वाहतूक पोलिसांनी चांगलीच तत्परता दाखवली. दु. वाजता रेडियन्ट हॉस्पिटलमध्ये ब्रेन डेड झालेल्या अनुप गायकवाडचे यकृत दोन्ही किडन्या अमरावती, मुंबई, नागपुरातील आठ डाॅक्टरांच्या पथकाने शस्त्रक्रियेद्वारे काढल्यानंतर क्षणाचाही विलंब करता दोन्ही अवयव निश्चित स्थळी पाठवण्यात आले. शहरातील रहदारीच्या मार्गावरून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या बेलोरा विमानतळावर केवळ १७ मिनिटांत यकृत पोहोचवण्यात आले अाहे. 

ब्रेड डेड (मृतक) झालेल्या अनुपच्या शरीरातून यकृत किडनी काढण्यासाठी डाॅक्टरांच्या पथकाला सकाळी १० ते दु. असा तीन तासांचा कालावधी लागला. दु. वाजताच्या सुमारास रेडियन्ट हॉस्पिटल येथून निघालेली यकृत घेऊन जाणारी विशेष रुग्णवाहिका एमएच २७ एक्स ९०३७ चा चालक मोहन रोडेनेही विशेष सावधगिरी बाळगून बेलोरा विमानतळावर पोहोचवली.
 
रुग्णवाहिकेत डाॅ. संदीप बडगुजर यांच्यासह मुंबई येथील डाॅक्टरांचे पथकही होते. बेलोरा येथे वाट बघणाऱ्या १८ आसनी विशेष विमानातून हेच पथक यकृत मुंबईला (ग्लोबल हॉस्पिटल)घेऊन गेले. 

मृत व्यक्तीच्या शरीरातून अवयव काढल्यानंतर पाच तासाच्या आत ते प्रत्यारोपित व्हायला हवे तरच त्याचा फायदा असतो. त्यामुळे प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. १५० कि.मी. अंतरावरील नागपूर ७५० कि.मी. अंतरावरील मुंबईला हे अवयव पाठवायचे होते. हृदय तीन तासाच्या आत, मूत्रपिंड सहा तासाच्या आत, यकृत चार तासाच्या आत प्रत्यारोपित करावे लागते, अशी माहिती रेडियन्टच्या तज्ज्ञ डाॅक्टरांनी दिली. 
 
उशीर झाला तर सर्वांच्या परिश्रमावर पाणी फेरले जाते. याची जाणीव असल्यामुळे रुग्णवाहिका लवकरात लवकर बेलोरा विमानतळावर पोहोचावी म्हणून वाहतूक पोलिसांनी ग्रीन काॅरीडोर तयार केले. त्यांनी रस्त्यावरील वाहतूक अडवून धरली. तसेच यकृत घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करून दिला. याचवेळी नागपुरच्या दिशेने दोन मुत्रपिंड घेऊन जाणाऱ्या विशेष रुग्णवाहिकेलाही ग्रीन काॅरिडाेर तयार करून मार्ग देण्यात आला. पुढे वाहतूक पोलिसांची गाडी सतत मार्ग मोकळा करून देत होती. त्यामुळे मुत्रपिंडही अवघे दीड ते दोन तासात नागपुरात पोहोचले. 
 
यासाठी रेडियन्ट रुग्णालयातील डाॅक्टरांचे पथक, कर्मचारी, रुग्णवाहिकेचे चालक, वाहतूक पाेलिस विभागाचे निरीक्षक अर्जुन ठोसरे त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष योगदान राहिले. सर्व यंत्रणेने व्यवस्थित काम करावे म्हणून शासकीय विभागीय वैद्यकीय समन्वयक डाॅ. रवी वानखडे आणि सुपर स्पेशालिटी हाॅस्पिटलचे डाॅ. श्यामसुंदर निकम यांनी मंुबई, नागपूर, पुणे असा सुरेख समन्वय राखून जबाबदारी पूर्ण केली. 
 
या मार्गाने नेण्यात आले अवयव : रेडियन्ट हाॅस्पिटलमधून निघाल्यानंतर सबनीस प्लाॅट, कंवर नगर, दस्तुर नगर चौक, छत्री तलावापासून बापयासवर, तेथून बडनेरा बडनेरा येथून बेलोरा विमानतळ या रहदारीच्या मार्गाने अवयव विमानतळावर नेण्यात आले. यात वाहतूक पोलिसांची कामगिरी चोख होती. कुठेही अवयव नेणाऱ्या वाहनाला अडथळा होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली. नागपुरला रस्त्यानेच विशेष रुग्णवाहिकेतून मुत्रपिंड पोहोचवण्यात आले. पुढे वाहतूक पोलिसांची गाडी एस्काॅर्ट करीत असल्याने रुग्णवाहिकेला कोणताही अडथळा झाला नाही. 
 
अवयव दानाचा मिळणार समाजाला संदेश 
आजवर शहरात बरेचदा नेत्रदान झाले परंतु, अवयवदान झाले नव्हते. परंतु, रेडियन्ट हाॅस्पिटलमध्ये सोय असल्यामुळे शहरात अन् विभागात प्रथमच मृतकाच्या शरीरातून अवयव काढून काही तासाने ते गरजू रुग्णांच्या शरीरातही प्रत्यारोपित करण्यात आले. या घटनेमुळे अमरावती विभागातील नागरिकांना प्रत्यारोपणाचा संदेश मिळाला आहे. एका रुग्णाशी अनेक जण निगडीत असतात त्यामुळे जर त्याचे प्राण वाचले तर कुटुंब वाचते. हे सर्वात मोठे दान आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागृती निर्माण होण्यास मदत मिळणार असल्याचे मत रेडियन्ट हाॅस्पिटलच्या डाॅक्टरांनी व्यक्त केले. 
 
बातम्या आणखी आहेत...