आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तात्पुरत्या भारनियमनमुक्तीसाठी ऊर्जामंत्र्यांना साकडे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- जिल्ह्यातअतिरिक्त भारनियमनामुळे शेतकऱ्यांना शेतात सिंचन करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाऊस नाही. सध्या पिकांना सिंचनाची गरज आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत भारनियमन पूर्णत: बंद करावे, असे निर्देश अधिक्षक अभियंत्यांना दिले. यासंदर्भातील प्रस्ताव ऊर्जामंत्र्यांकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी वीज वितरणाचे अधिक्षक अभियंता सतीश भटकर यांना दिले.

जिल्ह्यात पाऊस नसल्याने पिकांना सिंचनाव्दारे जिवदान देण्याची वेळ आली आहे. मात्र, सध्या दिवसा चार तासांवर आणि रात्रीही भारनियमन केल्या जात आहे. परिणामी सिंचन करताना अनंत अडचणी निर्माण होत आहेत. सुविधा असुनही असंख्य शेतकऱ्यांना विजेअभावी सिंचन करता येत नाही. शेतकऱ्यांची ही समस्या लक्षात घेऊन जिल्ह्यात कृषीपंपांना वीज जोडणी देण्यासाठी पुढील १५ दिवस ते एक महिन्यापर्यंत भारनियमनमुक्तीबाबत पालकमंत्री संजय राठोड यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक गुप्ता यांच्याशी चर्चा केली. पाऊस नसल्याने पिकांना सिंचन आवश्यक असून, विजेची गरज आहे. त्यामुळे असा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता सतीश भटकर यांना दिले. पालकमंत्री संजय राठोड यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे एमडी गुप्ता यांनीही सदर प्रस्तावावर तत्काळ कार्यवाही करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ही समस्या सोडवू असे सांगितले. हा प्रस्ताव तत्काळ शासनाकडे पाठविण्याची कार्यवाही सुरू असून, लवकरच यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

तक्रारीत झाली होती वाढ
भारनियमनामुळेग्रामीण भागातील जनता शेतकरी वैतागले आहेत. शेतात विहिरींना पाणी आणि अनेक गावांच्या शिवारात जलयुक्त शिवारच्या बंधाऱ्यांमध्येही सिंचनासाठी पाणी उपलब्ध आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात भारनियमन असल्याने सिंचन करता येत नाही. यासंदर्भात अनेक शेतकऱ्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्याकडे दाद मागितली होती.

कमी दाबामुळे नुकसान
सध्यासिंचनासाठी केवळ विजेवरच अवलंबून राहावे लागत आहे. यात भारनियमन तसेच अवेळी जाणारी वीज अत्यंत त्रासदायक अशी ठरत आहे. भरीस भर म्हणजे अनेक ठिकाणी एकाचवेळी मोटारपंप सुरू होत असल्यामुळे कमी दाब निर्माण होत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना आर्थीक फटका सहन करण्याची वेळ आली आहे.