आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीवरील अत्याचार प्रकरणी तिघांवर अखेर बलात्काराचा गुन्हा, आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वरुड - महाविद्यालयीन युवतीवर अत्याचार केलेल्या तीन युवकांविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने संतापलेल्या लोणी येथील नागरिकांनी 2 डिसेंबरला कडकडीत बंद पाळला. यामुळे बेनाडा पोलिसांवर दबाव आला. ग्रामस्थांचा वाढता दबाव पाहून पोलिसांनी या प्रकरणी तीनही युवकांविरुद्ध रविवारी रात्री उशिरा बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले. जयेश काळे (३२) रा. लोणी आणि त्याचे दोन मित्र अनिकेत मालपे (२५) राहुल चोबीतकर (२०) अशी बलात्काराचा आरोपींची नावे अाहेत.

 

घटनेच्या दिवशी बेनोडा पोलिस स्टेशन अंतर्गतच्या एका गावातील २० वर्षीय युवती महाविद्यालयातून घरी परत येत असताना जयेश काळे याने आपल्या वाहनातून युवतीला घरी सोडून देण्याचे सांगत वाहनात बसवले. पुढे अनिकेत मालपे राहुल चोबीतकर हे देखील वाहनात आलेत. त्यांनी युवतीवर अत्याचार करत तिला वाहनातून ढकलून दिले. युवतीवर नागपूर येथे उपचार सुरू होते. प्रारंभी युवतीने ऑटाेतून खाली पडल्याचे पोलिसांना सांिगतले होते. युवतीच्या नातेवाइकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ऑटाे चालकाला ताब्यात घेतले होते. दरम्यान, २८ नोव्हेंबरला युवतीने तिन्ही युवकांनी अत्याचार केल्याची तक्रार बनोडा पोलिसात दाखल केली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. 1 डिसेंबरला त्यांची जामिनावर सुटका झाली. या प्रकरणी पोलिस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत बंद पाळून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली होती.

बातम्या आणखी आहेत...