आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू देवस्थानांनी करावे मिशनऱ्यांप्रमाणे काम, मा. गाे. वैद्य यांचा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘आरोग्याच्या क्षेत्रात ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या कामाला तोड नाही. त्यांच्यातील सेवावृत्ती अतिशय वाखाणण्यासारखीच असून हिंदू देवस्थानांनीही अशा पद्धतीने समाजात जाऊन काम करण्याची गरज आहे,’ असा सल्ला संघाचे माजी प्रवक्ते व ज्येष्ठ पत्रकार मा. गो. वैद्य यांनी बुधवारी नागपुरात बोलताना दिला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालापात वैद्य बोलत होते. मिशनऱ्यांच्या सेवाकार्याबद्धल विचारले असता ते म्हणाले, ‘मी १७ वर्षे ख्रिश्चन समाजासोबत काम केले. त्यांच्या कामाची मला चांगली माहिती अाहे. हिंदू देवस्थांनीही त्या पद्धतीने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. संघमुक्त भारताचे आवाहन नितीशकुमार यांनी केले आहे, त्याकडे लक्ष वेधले असता ‘त्यांनी प्रयत्न करायला हरकत नाही. मात्र, संघावर ज्या वेळी बंदी आणली गेली त्या वेळी संघाच्या कामाचा विस्तारच झाला,’ असा दावा वैद्य यांनी केला. विदर्भासह इतर नव्या राज्यांच्या निर्मितीसाठी नव्याने राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करावी. या आयोगाला एक वर्षाची मुदत देऊन कालबद्ध पद्धतीने आयोगाकडून अहवाल मागवावा, असे मत व्यक्त करून वैद्य यांनी पुन्हा एकदा विदर्भ राज्याच्या निर्मितीशी सहमती दर्शवली. जनगणनेनंतर पुनर्रचना आयोग स्थापन करावा. त्यातून जनभावनांचा विचार करता येईल, असे ते म्हणाले. छोट्या राज्यांच्या निर्मितीवर संघाची कुठलीही भूमिका नाही. संघ या भानगडीत पडत नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
वैद्य वाणी..!
> भाजप आणि शिवसेनेतील कुरघोडीवर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना वैद्य म्हणाले की, ‘एका घरात वाद होतातच. शेजाऱ्यांमध्येही वाद होतात. त्यामुळे संबंध तुटत नाहीत. दोघांनाही एकमेकांची गरज आहे,’ असे सांगताना केंद्र व राज्य सरकार चांगले काम करत असल्याचे प्रशस्तिपत्रही त्यांनी दिले.
> आपल्याकडे धर्माचा अत्यंत चुकीचा अर्थ लावला जातो. धर्माचा अर्थ रिलीजन असा मुळीच नाही. धर्माचा अर्थ खूपच व्यापक असून रिलीजन हा त्याचा एक छोटा भाग आहे. स्वत:च्या पलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करणे, यालाच धर्म असे म्हणतात, असे स्पष्टीकरणही
वैद्य यांनी दिले.