आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक; ऐतिहासिक धर्मसंस्कृती महाकुंभ २३ पासून, नागपुरातील रेशीमबाग मैदानावर कार्यक्रम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नागपुरातीलरेशीमबाग मैदानावर विराट, ऐतिहासिक सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा देवदुर्लभ सोहळा येत्या २३ ते २५ डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. विराट धर्मसंस्कृती महाकुंभ या राष्ट्रीय सोहळ्यात भारत मातेच्या सेवेसाठी सर्वच धर्म, संप्रदायांचे देशभरातील १११८ संत सहभागी होणार आहेत.
वैदीक सांप्रदायीक असे दोन प्रकारचे संत देशभरातून एकाचवेळी एकत्र येत आहेत, हेच या महाकुंभाचे वैशिष्ट्य होय. सहा पीठांचे शंकराचार्य, इस्काॅन नाथ संप्रदायाचे प्रमुख, बौद्ध, जैन, शीख, मुस्लीम किन्नर पंथाच्या प्रमुखही या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

संत क्षेत्रात दोष शिरू नये यासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासोबतच, देशसेवा आणि २०२५ पर्यंत भारताला जगदगुरू बनवण्याच्या उद्देशाने प्रथमच एवढ्या मोठ्या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले असून यासाठी १६ एकरात विशाल पेंडाल टाकण्यात आला आहे. ५१ शाळा, महाविद्यालये, मंगल कार्यालयांमध्ये सर्वांच्या वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. विशाल आकाराच्या पाकगृहात सर्वांसाठी एकत्रितपणे स्वयंपाक करून तो विविध ठिकाणी पाठवला जाणार आहे. संत शक्ती देशकी, सेना समाज परिवार की हे या महाकुंभाचे ब्रीदवाक्य आहे. २३ रोजी ध्वजारोहणाने शुभारंभ होणार असून सकाळी राष्ट्रीय वैदीक संमेलनांतर्गत ६०० वैदीक , याज्ञिक पुरोहित एकत्र येतील. याच दिवशी सायंकाळी विविध संप्रदायाचे संत एकत्र येऊन राष्ट्रीय संगोष्टीला सुरुवात करतील. २४ रोजी प्रेरणासंगम कार्यक्रमांतर्गत शहिदांच्या पत्नी, आई आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या जवानांचा सन्मान केला जाणार आहे. त्यांची सुखदु:ख वाटून घेतली जाणार आहेत. याचे आयोजन विश्वमांगल्य सभा या देशव्यापी महिला संघटनेतर्फे करण्यात आले आहे. यानंतर दु. ते या कालावधीत मातृसंसदेचे उद्घाटन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार असून देशातील २० हजार अग्रणी महिला याप्रसंगी उपस्थित राहतील. देशातील मातृत्व शक्ती आता राष्ट्र संस्कार शक्तीने संपन्न होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण ठरावही यात होणार आहेत.

सायं. ते या कालावधीत देशातील सर्व संत वेगवेगळ्या ठिकाणी दोन लाख लोकांशी संवाद साधतील. २५ रोजी एकाच व्यासपीठावर एक हजार संत एकत्र येणार आहेत. दु. १२ वाजता राष्ट्रधर्म संस्कृती परिक्रमेचे शहरात आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभादरम्यान ११ लक्ष रुद्राक्षांचे ११ फुटी शिवलींग उभारले जाणार असून जगभरातील १६५ देशांमध्ये प्रसारण केले जाणार अशी माहिती, पत्र परिषदेत श्री नाथपीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांनी दिली. याप्रसंगी डाॅ. सुरेश चिकटे, विजयकृष्ण महाराज, ज्ञानेश्वर पातशे महाराज, ज्ञानेश्वर गुल्हाने महाराज, श्याम महाराज निचित, एचव्हीपीएम सचिव डाॅ. माधुरी चंेडके, प्रा. पूजा देशमुख, झोंबाडे महाराज, प्रकाश मोरे, गणेश जोशी आदी उपस्थित होते.

भोंदूकी साधू हे लोकांनी ठरवावे
जिल्ह्यातगत तीन महिन्यात दोन महाराजांचा व्याभिचार उघडकीस आला आहे. याबाबत बोलताना कोण भोदू की साधू हे लोकांनीच ठरवायला हवे. महाराष्ट्र वगळता इतर सर्व राज्यातील पीठ, आखाडे, धार्मिक पंथात व्याभिचारी महाराजांना शासन करून वठणीवर आणण्याची विशेष सोय आहे. परंतु, महाराष्ट्रात अशी सोय नाही. यासाठी येथे पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत श्री जितेंद्रनाथ महाराजांनी व्यक्त केले.

२५ डिसेंबर रोजी सकाळी ते १२ या कालावधीत देशातील १११८ संत देशातील लाखो लांकांना राष्ट्र संस्कृती रक्षणाची तसेच परिवार संस्थेचा राष्ट्रधर्मसंस्कृतीच्य अनुकूल उपयोग विकास करण्याची प्रतिज्ञा देणार आहेत. याप्रसंगी ज्योतीष मठाचे शंकराचार्य जगदगुरू वासुदेवानंद सरस्वती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत, श्रीनाथ पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज, काशी सुमेरू पीठाचे नरेंद्राचार्य महाराज, कर्नाटक हम्पीचे विरुपाक्ष सरस्वती महाराज, गोरक्षपीठाधीश्वर योगी आदित्यनाथ महाराज, रामानुजाचार्य चेन्नाजीयर स्वामी, हरियाणाचे गरीबदास, करवीर पीठाचे विद्यानृसिहभारती आदि उपस्थित राहतील.

संत सेना एकत्रितपणे करणार काम
देशाच्या संपूर्ण सीमावर्ती राज्यातील सर्व मठ, मंदिरं आश्रमांचा उपयोग आता या भागातील सर्वसामान्य नागरिकांचे मनोबल उंचावण्यासाठी, त्यांची संस्कृती देशभावना विकसित करण्यासोबतच भारतीय सेनेचे सामर्थ्य मनोबल वाढवण्यासाठी केले जाईल, असे श्री जितेंद्रनाथ महाराजांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...