आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’ची आणखी तब्बल ११६ कोटींची मालमत्ता उघड, १० हजार गुंतवणूकदारांचे २० कोटी फसले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कमी दिवसात गुंतवणूक केलेल्या रकमेच्या तुलनेत गुंतवणूकदारांना अधिक पैसा व मालमत्ता देण्याचे आमिष दाखवून ‘मैत्रेय’ने राज्यातील विविध शहरात हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल झालेले आहेत. दरम्यान, अमरावती शहरात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने मैत्रेय ग्रुपची राज्यातील विविध शहरात असलेली तब्बल ११५ कोटी ८८ लाख रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता उघड केली आहे. ही मालमत्ता यापूर्वी कोठेही उघड झालेली नाही, हे विशेष. या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमल्यानंतर गुंतवणूकदारांना दिलासा देण्याबाबत प्रक्रिया करण्यात येणार आहे.

मैत्रेयविरुध्द अमरावतीसह अकोला, नाशिक, परभणी याठिकाणी गुन्हे दाखल आहेत. अमरावतीमध्ये हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून मैत्रेयची मालमत्ता राज्यात कोणत्या ठिकाणी आहे, याबाबत राज्यातील सर्वच जिल्हा उपनिबंधकांना पत्र पाठवले होते. दरम्यान, मैत्रेयची मालमत्ता असलेल्या ठिकाणांच्या मालमत्तेसंदर्भात संबंधित उपनिबंधकांकडून अमरावती पोलिसांना माहिती प्राप्त झाली आहे. जवळपास ११५ कोटी रुपयांची ही मालमत्ता असल्याचे उघड झाले आहे. मात्र यापैकी १०० कोटींच्या मालमत्तेचे सविस्तर वर्णन व कागदपत्र अद्याप पोलिसांना प्राप्त झाले नसले तरी लवकरच हे कागदपत्र पोलिसांना मिळतील, असा विश्वास तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी उघड केलेल्या ११५ कोटी ८८ लाखांच्या मालमत्तेपैकी १५ कोटी ८८ लाखांच्या मालमत्तेचे सर्व दस्ताऐवज व वर्णन पोलिसांना प्राप्त झाले आहेत. त्या मालमत्तेवर सक्षम प्राधिकारी नेमण्याबाबत पोलिसांनी १४ सप्टेंबरलाच अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे. तपास पोलिस निरीक्षक गणेश अणे, उपनिरीक्षक श्रीकृष्ण पारधी व आर्थीक गुन्हे शाखेच्या पथकाकडून करण्यात येत आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, ‘ईओडब्ल्यू’ने उघड केलेली १५ कोटी ८८ लाखांची मालमत्ता
बातम्या आणखी आहेत...