आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला मल्लखांब दिन विविध कार्यक्रमांनी आज होणार साजरा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मल्लखांबहा खेळ पेशवाईपासून ते २१ व्या शतकापर्यंत साता समुद्रापलिकडे युरोपातील बर्लीन, जर्मनी, लंडन, डेन्मार्क, श्रीलंका तसेच विदेशातील अनेक देशात लोकप्रिय होत आहे. सोबतच भारतीय क्रीडा प्रणालीमध्येही मल्लखांबने वेगळा ठसा उमटवला आहे. अशा या शरीर पीळदार बनवणाऱ्या खेळाचा पहिला मल्लखांबदिन राज्यभरात १५ जून रोजी साजरा करण्याचे ठरवण्यात आले आहे. याअंतर्गत शहरातील मुख्य राजकमल चौकात सायं. वाजता या खेळाचे काैशल्य प्रदर्शन केले जाणार आहे. 
 
शहरातील एचव्हीपीएमद्वारे देश विदेशात मल्लखांबचा प्रचार प्रसार सुरू आहे. मल्लखांबचे प्रदर्शन तर १९३६ च्या बर्लीन आॅलिम्पिकमध्येही झाले होते. तेव्हापासून संपूर्ण युरोपात या खेळाने चांगलीच प्रसिद्धी मिळवली असून दरवर्षी एचव्हीपीएम येथील पथकाला युरोपात आमंत्रण मिळत असते. 

ज्याप्रमाणे प्रत्येक मंगल सोहळा साजरा करण्यासाठी एक दिवस निवडण्यात आला आहे, त्याचप्रमाणे राज्य मल्लखांब संघटना, सर्व जिल्हा संघटना मल्लखांबपटूंनी १५ जून हा दिन मल्लखांब दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. 

मल्लखांबचे आद्यगुरू स्व. बाळाभट्टदादा देवधर यांना १५ व्या शतकातील चैत्र नवमीच्या दिवशी नाशिक येथील सप्तश्रृंगी देवीने दृष्टांत दिला सांगितले प्रत्यक्ष बजरंगबली तुला कुस्तीचे डाव शिकवतील. त्यानुसार मारुतीरायांनी बाळाभट्ट यांना एका लाकडी लाटेवर कुस्तीचे डाव दाखवले. त्याप्रमाणे दादांनी सराव केला ठरलेल्या मुदतीत पुणे येथे परत येऊन कुस्तीच्या दंगलीमध्ये अली नावाच्या पहिलवानास गडेलोड या डावाने पराभूत केले. ते बघून अन्य एक नामांकित पहिलवान गुलाब पळून गेल्याची अख्यायिका आहे. 

एक लक्ष साधी उडी 
आज राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवून पुरलेला, टांगता दोरीच्या मल्लखांबावरती एक लक्ष साधी उडीचा संकल्प घेण्यात आला आहे. या एका लक्षाचे पुष्प श्री हनुमंतांच्या चरणी वाहण्यासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ जिल्हा मल्लखांब संघटनेद्वारे शहरासह जिल्ह्यात कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती देशातील पहिले मल्लखांब साई प्रशिक्षक प्रा. विलास दलाल यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...