आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एप्रिल-मे महिन्यात मेळघाटात ७९ बालमृत्यू, २८४ गर्भवती धोकादायक स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मेळघाटात यंदा कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूंमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्यांत मेळघाटात ७९ बालमृत्यू झाले. गेल्या वर्षी याच काळात ४१ बालमृत्यूंची नोंद होती. यंदा याच दोन महिन्यात ९ मातांचाही मृत्यू झाला. मागील वर्षी या कालावधीत एकही मातामृत्यू नव्हता हे विशेष. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या मासिक प्रगती अहवालात ही माहिती आहे.
गेल्या काही वर्षात मेळघाटातील बालमृत्यू कमी होत असल्याचे चित्र असताना यंदा धारणी व चिखलदरा या दोन तालुक्यात पावसाळ्यापूर्वीच वाढलेल्या बालमृत्यूने धोक्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मे महिन्यात १३ तर जूनमध्ये २५ बालमृत्यू अधिक आहेत. जूनमधील बालमृत्यूंच्या आकडेवारीची नोंद अद्याप आरोग्य विभागाच्या अहवालात नाही.

२८४ गर्भवती धोकादायक स्थितीत
मेळघाटातील ३५०० गर्भवतींपैंकी २८४ जणींची हिमोग्लोबीन पातळी ७ च्या खाली आली असल्याचे पूर्वमान्सून सर्वेक्षणात आढळून आले. ही पातळी गर्भवती महिलेकरिता धोकादायक अवस्था दर्शवते. ही पातळी वाढवण्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे मेळघाटातील अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. किशोर बोबडे यांनी सांगितले. एप्रिल-मे मध्ये बालमृत्यू अधिक झाले आहेत ही वस्तुस्थिती आहे. या दोन महिन्यात उन्हाळा तीव्र होता. तापमानाचे प्रमाण देखील वाढले होते. हे सुध्दा एक कारण आहे, असेही डॉ. बोबडे यांनी स्पष्ट केले.

रोज एका बालकाचा मृत्यू
मेळघाटात एप्रिल व मे महिन्यातील ६१ दिवसांत ७९ बालमृत्यू झाले. दरदिवशी एक बालक कुपोषणामुळे दगावतो आहे. कळमखार, हरिसाल, बैरागड, चिखलदरासह तेरा आरोग्य केंद्रामध्ये ० ते १ वर्ष वयाच्या ६० अर्भकांचा तर एक ते सहा वर्षे वयाचे १९ बालमृत्यू आहेत. यात अर्भक मृत्यूंचे प्रमाण तुलनेत सर्वाधिक आहे.
निधीचा योग्य उपयोग नाही
दोन वर्षापासून मेळघाटात निधीचा उपयोग योग्य प्रमाणात होत नाही. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचेही लक्ष मेळघाटाकडे नाही. वैद्यकीय अधिकारी नाहीत.
अॅड. बंड्या साने, सामाजिक कार्यकर्ते, खोज संस्था

धारणी-चिखलदरा तालुक्यातील ३२३ गावांमधील स्थिती
१)० ते ६ वर्ष वयोगटातील एकूण बालके -३६,०४९
२)आतापर्यंत वजन घेतलेली बालके -२७१९१
३)सर्वसाधारण श्रेणीमधील बालके -२७१९१
४) मध्यम तीव्र कुपोषित (मॅम) -२८१४
५)अति तीव्र कुपोषीत(सॅम) -५७०
६)एकूण कुपोषित बालके -३३८४

गर्भवती महिलांची स्थिती :
१) गर्भवती -३४६७
२)आरोग्य तपासणी केलेल्या गर्भवती -२९१२
३)आजारी गर्भवती -९८
४)औषधोपचार केलेल्या गर्भवती -९७
५)जोखमीच्या गर्भवती -७०३
६)दरमहा अपेक्षित वजनात वाढ न होणाऱ्या -१३३
७) हिमोग्लोबीन पातळी ७ पेक्षा कमी असलेल्या -२८४
८)हिमोग्लोबीन ७ ते ११ मध्ये असलेल्या -२६१०
९)हिमोग्लोबीन पातळी ११ च्या वर असलेल्या गर्भवती -१८

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...