आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस- नक्षलवादी चकमकीची दंडाधिकारी चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली - पोलिस मदत केंद्र, गट्टा हद्दीतील मौजे भीमपूर जंगल परिसरात दिनांक २८ जुलै २०१६ ला झालेल्या पोलिस-नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाल्याचे दिसून येते. त्या महिला नक्षलवादीचे मृत्यूचे कारण शोधणे आवश्यक असल्यामुळे दंडाधिकारी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

या प्रकरणात फौजदारी संहिता १९७३ चे कलम १७६ अन्वये मृत्यूच्या कारणाचा तपास करणे आवश्यक असल्याची खात्री झाली आहे. याद्वारे त्या परिसरातील कोणाला उक्त प्रकरणात काही माहिती, निवेदन, साक्ष-पुरावा व इतर माहिती अथवा प्रतिज्ञालेख सादर करावयाचे आहे, त्यांनी जाहीरनामा प्रसिध्दीच्या दिनांकापासून १५ दिवसाच्या आंत किंवा २५ सप्टेंबरपर्यंत उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांचे न्यायालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे. अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, गडचिरोली यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...