आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाेबीसींचे नव्हे, मराठ्यांना स्वतंत्र अारक्षण लागू करा, मराठा-कुणबी क्रांती मोर्चात भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - पूर्व िवदर्भातील पहिला मराठा-कुणबी क्रांती मोर्चा बुधवारी चंद्रपूर येथे काढण्यात आला. चंद्रपूरपासून सात किलाेमीटर अंतरावरील म्हाडा काॅलनी येथील पाण्याच्या टाकीजवळील मैदानातून माेर्चाला सुरुवात झाली.

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यात यावे, सन २०११ च्या जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करण्यात यावी, कोपर्डी घटनेतील आरोपींना सहा महिन्यात फाशीची शिक्षा देण्यात यावी, अॅट्राॅसिटी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी त्यात योग्य सुधारणा करण्यात याव्या, बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेला महाराष्ट्रभूषण पुरस्कार तत्काळ परत घेण्यात यावा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना शहिदांचा दर्जा देऊन त्यांच्या वारसांना शासकीय नोकरी द्यावी व १५ लाख रुपये द्यावे, अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम त्वरित सुरू करावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात अाले.

राज्यातील इतर मराठा मोर्चांप्रमाणे याही मोर्चाचे नेतृत्व िवद्यार्थिनींनी केले. चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राउंडवर सभा झाली. मुलींच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. या मोर्चासाठी मराठा व कुणबी समाजातील नेते-कार्यकर्ते गेल्या आठवडाभरापासून पक्षीय मतभेद बाजूला ठेवून झटत होते. दौरे आणि बैठकांनी संपूर्ण िजल्हा पिंजून काढला होता. आजचा मोर्चा लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात येणारी वाहतूक इतर मार्गांनी वळवली होती, तर शाळा- महाविद्यालयांना अघोषित सुटी होती.

बिदरमध्येही मराठा माेर्चा
बिदर | राज्यभर घाेंगावणारे मराठा क्रांती माेर्चाचे वादळ अाता शेजारी राज्यातही धडकले अाहे. कर्नाटकातील बिदर शहरात बुधवारी मराठा माेर्चा काढण्यात अाला. कर्नाटकात असलेल्या अाठ टक्के मराठा समाजाला तेथील सरकारकडून कसल्याच प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने या माेर्चाद्वारे तेथील सरकारचे लक्ष वेधण्यात अाले. तसेच मराठा अारक्षण व काेपर्डीतील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अादी मागण्यांचे निवेदनही स्थानिक प्रशासनाला देण्यात अाले. पापनास गेटपासून सुरू झालेला या मूकमाेर्चा बसस्थानक, मडिवाळ चौक, जनरल करिअप्पा चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शहीद भगतसिंग चौक, महात्मा बसवेश्वर चौक, छत्रपती शिवाजी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
बातम्या आणखी आहेत...