आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आतापर्यंत केले दहा निराधार मुलींचे लग्न; आज होणार अकराव्या मुलाचे शुभमंगल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गडगंज संपत्ती आहे, राजकीय पुढारी आहे. शासनाकडून निधी येतो आहे यापैकी कशासोबतही संबध नसणाऱ्या एका सर्वसामान्य व्यक्तीने त्याच्या आयुष्यात आतापर्यंत एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल दहा निराधार मुलींचे विवाह लावून दिले. यामध्ये कोणी अनाथ होते तर कुणाला आधार नव्हता. सोमवारी (दि. ८) हेच गजानन जाधव आणखी एका गरीब कुटूंबातील मुलाचे लग्न लावून देणार आहे. या विवाहसोहळ्याची परिपुर्ण तयारी झाली आहे.
 
गजानन जाधव हे गर्भश्रीमंत नाही किंवा त्यांची कोणतीही सामाजिक संस्था नाही. स्वत: अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून ते पुढे आले आहे. मागील अठरा वर्षांपासून ते कॅटरिंगचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून येणाऱ्या पैश्यातून आपला संसाराचा गाढा चालवून त्यांच्या संपर्कात आलेल्या निराधार व अनाथ मुलींचे पालन पोषणही त्यांनी केले आहे. ईतकेच नाही तर त्या मुलींचा धडाक्यात विवाह लावून देण्याची जबाबदारी सुध्दा ते हसत हसत आणि खंबीरपणे घेऊन यशस्वीपणे पुर्ण करतात. 
 
दरम्यान त्यांचे मार्डी मार्गावर घर आहे. याच घरात छोटेखोनी कार्यक्रम पार पडेल, असा एका हॉल त्यांनी बांधला आहे. गजानन जाधव निराधारांना मदत  करतात, हे ऐकूण परिसरातच काम करणारा अनिल कांबळे हा युवक जाधव यांच्याकडे आला त्याने हाच हॉल भाड्याने मागितला. पैसे थोडे कमी घ्या, अशी विनंती केली. मात्र ‘शेरदिल’ मनाच्या गजानन जाधव यांनी अनिलला पैसे कमी काय? पैसेच देऊ नको, मीच लग्न करतो. असे आश्चर्यकारक उत्तर दिले. इतकेच नाही तर अकोला येथील ज्या मुलीसोबत अनिलचे लग्न जुळले आहे, तीलाच या ठिकाणी घेवून ये, आपण लग्न करून देवू, असा प्रस्ताव ठेवला. जेमतेम परिस्थिती असलेल्या अनिलने हा प्रस्ताव तातडीने मान्य करून होकार दिला. त्यामुळे मे रोजी सकाळी ११ वाजता हा विवाह सोहळा पार पडणार आहे. गजानन जाधव यांनी आजवर नऊ मुलींचे लग्न लावलेले आहे, त्यामध्ये तर सात मुलींचे कन्यादान गजानन जाधव त्यांच्या पत्नी प्रमिला यांनी केले आहे. गजानन जाधव यांच्या याच समाजकार्याची दखल घेऊन नागरिकांनी त्यांच्या पत्नीला नगरसेविका म्हणून निवडून दिले आहे. अनिल कांबळे यांच्या लग्नाच्या निमित्ताने गजाननराव सोमवारी अकरावे लग्न आपल्या हातून पार पाडणार आहे. गजानन जाधव यांचा या कामात पुढाकार असतोच याचवेळी त्यांना कुटूंबातून तसेच संजय बाळापुरे, प्रवीण घरडीकर, सुरेश हुसे, अॅड. राजेश बतरा, किशोर बडे, बाळासोहब टेकाडे, गजू आप्पा बाहेकर, राजू शेंडे, इश्वरआप्पा मुंजाळे, रामकृष्ण राऊत, पंकजराव वानखडे, राजू सोळंके, शिवाजी कनोजे, विकास वाकोडे, जंयत चौधरी, राहुल देशमुख, रामराव काळे यांच्यासह परिसरातील शेकडो मित्रमंडळींचा सर्वच बाबतीत सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...