आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: महापौरपदी भाजपचे संजय निरवणे तर उपमहापौरपदी संध्या टिकले यांची निवड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती -  अमरावती महानगरपालिकेत एकहाती सत्ता मिळवल्यानंतर गुरुवारी महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक झाली. यात महापौरपदी भाजपचे संजय नरवणे तर उपमहापौरपदी संध्या टिकले यांची निवड झाली. तर महत्त्वाच्या अशा स्थायी समितीच्या किल्ल्या भाजपचेच तुषार भारतीय यांच्याकडे सोपवण्यात आल्या. 

महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या संजय नरवणे यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा शिंदे या रिंगणात होत्या. या निवडणुकीत नरवणे यांना 56 तर शोभा शिंदे यांना 15 मते मिळाली. तर उपमहापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत संध्या टिकले यांनी 56 मते मिळवत काँग्रेसचे काँग्रेसचे वसीम मजीद यांचा पराभव केला. वसीम यांना 15 तर एमआयएमचे हुसैन मुबारक हुसैन यांना 10 मते मिळाली.
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, महापौर-उपमहापौर निवडणुकीचे PHOTOS
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...