आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्यांच्या नशिबी अंधार ते काय दिवाळी करणार; आमदार बच्चू कडू यांचा प्रश्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘दिवाळीचे दिवस आहेत उपोषण सोडा, असे अनेक बड्या नेत्यांनी मला समजावले. मात्र मी माझ्या मागणीवर ठाम आहे. ज्यांच्या नशिबी जन्माचाच अंधार पुजलेला आहे, त्यांच्यासाठी एक दिवाळी साजरी केली नाही तर काहीच बिघडणार नाही, असे मी सर्वांना सांगितले. शासनाने पालघरात राहणारे, अपंग, भूमीहीन शेतमजुर विधवा महिला, भटके, ज्येष्ठ यांना राहण्यासाठी घर देऊन विविध योजनांतर्गत त्यांना सुविधा दिल्या तरच खऱ्या अर्थाने यंदा दिवाळी साजरी होणार आहे. जोवर शासन मागण्या मान्य करणार नाही तोवर माझे अन्न त्याग आंदोलन सुरूच राहणार, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यातील पालघर निवासी, िदव्यांग, भूमीहीन विधवा महिला, माजी सैनिक या दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आ. कडू यांचे राष्ट्रसंत गाडगेबाबा समाधी मंदिरापुढे १३ ऑक्टोबर.पासून अन्न त्याग आंदोलन सुरू आहे. दुर्लक्षित घटकांसाठी असलेल्या आंदोलनाची मुख्यमंत्री संबंधित मंत्र्यांनी आजवर दखल घेतल्याने राज्यभर असंतोष, विविध ठिकाणी प्रहार कार्यकर्ते, िदव्यांग आणि पालघरवासी उपोषणाला बसले आहेत. 

राज्यातील वर्धा, अहमदनगर, सावंगी, औरंगाबाद, उस्मानाबाद, नांदेड, सातारा, धुळे, पुणे, परभणी, मुंबई, नाशिक, सोलापूर, यवतमाळ येथे एकूण सुमारे ७०० च्या वर पालघर निवासी, िदव्यांग प्रहार कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. राजकारणाच्या भावना दूर सारून शासनाने दुर्लक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन काळोखात जीवन जगणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यात निदान ही दिवाळी तरी प्रकाशमय व्हावी, यासाठी ठोस पाऊल उचलायला हवे, अशी मागणीही आ. बच्चू कडू यांनी केली. 

दिवाळीच्यादिवशी जल त्याग आंदोलन :आमच्या अनेक मागण्या शासनाने आजवर पूर्ण केल्या नाहीत. परंतु, दिव्यांग, शेतमजुर विधवा महिला, माजी सैनिकांना राहण्यास शासनाने घरे उपलब्ध करून देत त्यांना सोयी द्याव्यात म्हणून आमचे आंदोलन सुरू आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घ्यावी म्हणून अन्न त्याग आंदोलनादरम्यानच १८ ऑक्टोबर. रोजी राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील कलेक्टर आॅफिसपुढे प्रहार कार्यकर्ते दिव्यांग पालघर निवासी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून एक दिवसाचे लाक्षणिक अन्न त्याग आंदोलन करतील. मागण्या मान्य झाल्या नाही तर १९ ऑक्टोबर.ला आ. बच्चू कडू जलत्याग आंदोलन करणार आहेत. राज्य शासनाकडे करण्यात आलेल्या विविध मागण्यांसंदर्भात आमदार बच्चू कडू यांनी रविवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 
बातम्या आणखी आहेत...