आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाचा गळा दाबून आईची आत्महत्या, आजाराला कंटाळून निर्णय घेतल्याचे चिठ्ठीत नमूद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोर्शी- पाच वर्षांच्या चिमुकल्याचा गळा दाबून आईने गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास मोर्शी येथील असरानी ले आऊटमध्ये घडली. मागील दहा वर्षांपासून आजारी असल्याने आपण पतीला मुलांना सुख देऊ शकत नसल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे महिलेने मृत्यूपुर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे.
 
जयश्री दिनेशराव भांबुरकर (४०) असे आत्महत्या करणाऱ्या मातेचे तर वेदांत दिनेश भांबुरकर (५) असे चिमुकल्याचे नाव आहे. जयश्री यांचे पती दिनेश हे तालुक्यातील पार्डी येथे शिक्षक आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शाळेच्या कामानिमीत्त अमरावतीला आले होते. 
याचवेळी जयश्री यांच्या मुली नूतन (१४) अंतरा (१०) या शाळेत गेल्या होत्या.
 
दुपारच्या वेळी घरी कोणी नसल्याची संधी पाहून जयश्री यांनी वेदांतचा गळा दाबला असावा, यातच त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानंतर जयश्री यांनी पंख्याला गळफास लटकवून घेतला. सांयकाळी साडेचार वाजताच्या सुमारास दिनेश भांबुरकर हे घरी पोहचले. 
 
त्यावेळी त्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र बराच वेळ होवूनही दरवाजा उघडल्यामुळे त्यांना संशय आला.त्यामुळे त्यांनी शेजारी आवाज दिला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडल्यावर हा प्रकार दिसून आला. या प्रकरणाचा तपास मोर्शीचे ठाणेदार नंदकिशोर शर्मा करत आहे. जयश्री यांना २००६ पासून डोक्याचा त्रास होता. वारंवार आजारी असल्यामुळे पती किंवा मुलांना आपण सुख देऊ शकत नाही, त्यामुळेच आत्महत्या करत असल्याचे मृत्यूपुर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमुद केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...