आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या महिला रेल्वे चालक, पायलटचा उद्या होणार सन्मान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला चालक सुरेखा यादव. - Divya Marathi
भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला चालक सुरेखा यादव.
अमरावती- भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला चालक मुंबई येथील सुरेखा यादव (भोसले) तसेच अमरावती येथील इंडिगो एअर लाइन्सच्या पायलट प्रियंका राजेश सोनी यांचा प्राइड ऑफ वुमन पुरस्कार देऊन सन्मान केल्या जाणार असल्याची माहिती सुरेखा लुंगारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक हॉटेल ग्रँड महेफील येथे १४ एप्रिलला सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होणार अाहे. 
 
महिलांचा उद्योग क्षेत्र तसेच व्यवसायात सहभाग वाढावा या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महिला वींग’च्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख यांच्या निवड समितीने भारतातील पहिल्या महिला रेल्वे चालक सुरेखा यादव (मुंबई) जन्मगाव सातारा तसेच इंडिगो एअर लाइनन्सच्या पायटल प्रियंका राजेश सोनी मूळच्या अमरावती या दोन महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. 
 
या पुरस्काराचे प्रायोजकत्व हावरे बिल्डर्स, सतीश हावरे फाऊंडेशनच्या उज्वला हावरे यांच्याकडून करण्यात आले आहे. तसेच दुसरा पुरस्कार पत्रमहर्षी बाळासाहेब मराठे पुरस्कार दिला जाणार आहे. २०१५ मध्ये नांदगाव खंडेश्वर एमआयडीसी मधील तृप्ती पापडच्या संचालिका चंदा वानखडे तसेच माहेर गृह उद्योग अमरावतीच्या माया देशमुख ह्या मानकरी ठरल्या होत्या. या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य अतिथी म्हणून राज्याचे उद्योग मंत्री प्रवीण पोटे, आमदार अॅड. यशोमती ठाकुर, उज्वला हावरे, विलास मराठे, चेंबरचे अध्यक्ष विनोद कलंत्री, डॉ. वर्षा देशमुख उपस्थित राहणार आहे. 
 
पत्रकार परिषदेला चेंबरचे अध्यक्ष विनोद कलंत्री, महिला विंगच्या अध्यक्षा डॉ. वर्षा देशमुख, स्वाती बोरखडे, नीता होनराव, स्मिता लांडगे, पल्लवी मांडवगडे, जया हरवानी, स्नेहल झंवर, किरण अग्रवाल, पंकजा भेंडे, अर्चना मेघे, सुवासीनी सेठ उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...