आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती :मनपात भाजप,तर झेडपीत काँग्रेसची सत्ता, महापालिका: तब्बल 45 जागांवर फुलले कमळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महापौरांसह दिग्गजांचा पराभव
अमरावती - तब्बल २१ वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाली खेचून अमरावती महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने सार्वत्रिक निवडणुकीत अखेर झेंंडा फडकवला. भाजपने ८७ पैकी ४५ जागा जिंकत सत्तारूढ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले. तर शिवसेनेलाही अधिक जागा मिळवण्यापासून रोखले. भाजपने अमरावती महापालिकेत एकहाती सत्ता मिळविली आहे. या निवडणुकीत काँग्रेसला केवळ १५ जागांवर समाधान मानावे लागले. तर पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या ‘एमआयम’ने १२ जागा लढवून १० जागांवर विजय मिळविला. शिवसेनेने जागा जिंकल्या. आरपीआय आठवले गटानेही एक जागा जिंकून खाते उघडले. युवा स्वाभिमान पक्षाला जागा मिळाल्या. सर्वात धक्कादायक म्हणजे मावळत्या महापालिकेत १७ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक विजयी झाला नाही. विद्यमान महापौरांनाही मतदारांनी कौल दिला नाही. महापालिकेच्या इतिहासात स्थापनेनंतर भाजपला मिळालेले हे भरघोस यश असून मनपा निवडणुकीत एकाच वेळी ४५ जागा जिंकणारा भाजपसुद्धा पहिलाच पक्ष ठरला आहे. 
 
 
पारदर्श कारभार विकासाचा विजय 
- मुख्यमंत्री देवेंद्रफडणवीस यांचे नेतृत्व, भाजपचा पारदर्शी कारभार, विकास कामे आणि व्हिजन या मुळे अमरावतीकर मतदारांनी भाजपवर विश्वास टाकून हा कौल दिला. शहराचा सर्वांगाने विकास कसा होईल यावर भाजपचा भर राहणार आहे.
प्रवीणपोटे, पालकमंत्री, अमरावती जिल्हा. 

हाभारतीय जनता पक्षाचा विजय आहे 
- हा विजय भारतीय जनता पक्षाचा विजय आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांची भूमिका महत्वाची आहे. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने केलेल्या मेहनतीमुळे हे यश मिळाले आहे. अमरावतीकरांनी भाजपवर दाखविलेल्या विश्वासामुळेच आम्हाला विजय मिळविला. डॉसुनील देशमुख, आमदार, भाजप. 

निष्ठावानांची झाली आज खरी स्वप्नपूर्ती 
-भारतीय जनतापक्षाचा विकासाचा दृष्टीकोन आणि ‘सबका साथ सबका विकास’ या प्रमुख मुद्द्यांना मतदारांनी कौल दिला आहे. राज्यात आणि केंद्रातील सत्तेनंतर भाजपने विकासाची गंगा प्रत्येक जिल्ह्यात आणली आहे. स्थानिक स्वराज्य मतदारसंघात भाजपची सत्ता आली पाहिजे, हे निष्ठावान कार्यकर्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.
रामदास आंबटकर, प्रदेश सरचिटणीस, भारतीय जनता पक्ष. 
 
जि.प.: भाजपचा विजयरथ रोखला 
अमरावती - जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसने सर्वाधिक २६ जागा जिंकून भाजपचा विजयरथ रोखला. भाजपने १३ जागा जिंकून दुसरे स्थान पटकावले असून राकॉला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले. दरम्यान, राकॉ, अपक्षांच्या मदतीने कॉंग्रेसचा सत्ता स्थापनेचा मार्ग प्रशस्त झाला आहे. 
 
जिल्ह्यात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी दरम्यान सर्वच पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरल्यामुळे प्रथमच मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यातच भाजपच्या उमेदवारांसाठी मुख्यंमत्र्यांची सभा झाल्यामुळे ही निवडणुक प्रतिष्ठेची ठरली होती. दरम्यान मागील जि. प. निवडणुकीच्या तुलनेत भाजपला फायदा झाला असून कॉंग्रेसने जीवाचे रान करूनही केवळ एकाच जागेचा फायदा झाला. दरम्यान, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांची पत्नी पुजा हाडोळे, शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये गेलेले बाळासाहेब हिंगणीकर विजयी झाले आहेत. जि. प. चे माजी सभापती गिरीश कराळे, माजी सभापती अर्चना मुरूमकर यांचे पती नीळकंठ मुरूमकर, भाजपचे माजी जि. प. सदस्य सदाशिव खडके, जिल्हा बंॅकेचे उपाध्यक्ष अनंत साबळे, शिवसेनेचे माजी जि. प. सदस्य सुधीर सूर्यवंशी, माजी जि. प. उपाध्यक्ष संतोष महात्मे, कॉंग्रेसच्या माजी जि. प. सदस्या संगीता सवाई या पराभव पत्करावा लागला. बसपातून भाजपात गेलेले रवींद्र मुंदे, रिपाईतून भाजपात प्रवेश केलेले प्रताप अभ्यंकर मात्र विजयी झाले आहेत. 
 
 स्वाभिमानीशेतकरी संघटनेचे भुयार विजयी : बेनोडासर्कलमधून शेतकरी स्वाभीमानी पक्षाचे उमेदवार विविध आंदोलनाने चर्चेत राहिलेले देवेंद्र भुयार यांनी उर्वरित.पान. 
 
बातम्या आणखी आहेत...