आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: 2,522 केंद्रांवर आज मतदान, शहरात 130 केंद्र संवेदनशिल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती  - महापालिकेच्या ८७ जागांसह ग्रामीण विकासाचा केंद्र बिंदू असलेल्या जिल्हा परिषदेच्या ५९ तर दहा पंचायत समित्यांमधील ८८ जागांसाठी आज, २१ फेब्रुवारीला हजार ५२२ केंद्रांवर मतदान होणार आहे. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून, संवेदनशील मतदान केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जि.प. आणि पं.स. निवडणुकीत जिल्ह्यातील १३ लाख ९० हजार ९०२ मतदार तर महापालिकेच्या निवडणुकीत लाख ७२ हजार ६४८ मतदार आपला हक्का बजावणार आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ४१७ तर पंचायत समित्यांमधील ५३३ तर मनपाच्या ६२८ उमेदवारांचे भाग्य आज मतदान यंत्रामध्ये बंद होणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक यावर्षी प्रथमच सर्व प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे लढवित असल्यामुळे मतदारांसह सर्वच राजकीय पक्षात मतदार नेमके काय करणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या चौदा तालुक्यातील ५९ जागांसाठी ४१७ उमेदवार तर दहा पंचायत समितीतील ८८ जागांसाठी ५३३ उमेदवार रिंगणात आपले भाग्य अजमावत आहेत. मतदानासाठी जिल्ह्यात १७८७ मतदानकेंद्र निश्चित करण्यात आली असून मतदानासाठी ३१४१ मतदान यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. मतदारांना सकाळी साडे सात ते सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत मताधिकाराचा वापर करता येणार आहे.  
 
अंजनगावसुर्जी तालुका सर्वाधिक संवेदनशील : जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत निश्चित करण्यात आलेल्या १७८७ मतदान केंद्रांपैकी ५११ मतदार केंद्र संवेदनशील तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चार केंद्र अतिसंवेदनशील ठरविण्यात आले आहे. सर्वाधिक संवेदनशील केंद्राची संख्या अंजनगाव सुर्जी तालुक्यात ५७ असून तिवसा तालुक्यात सर्वात कमी पाच केंद्र संवेदनशील गणण्यात आले आहेत. यासोबतच चांदुर बाजार ५०, वरूड अमरावती प्रत्येकी ५४, अचलपूर ५६, भातकुली ४८, चिखलदरा १८, मोर्शी ३४, धारणी १०, दर्यापूर ४१, चांदुर रेल्वे १२, धामणगाव रेल्वे ३१ तर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात ४१ मतदान केंद्र संवेदनशील घोषित करण्यात आले आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, शहरात 130 केंद्र संवेदनशिल... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...