अमरावती - महानगर पालिकेसाठी होणाऱ्या मतदानाच्या काळात कुठेही गोंधळ होऊ नये, त्यासाठी पोलिसांकडून पुरेपूर खबरदारी घेण्यात येत आहे. या संपुर्ण प्रक्रियेत कुठलीच कमतरता राहू नये म्हणून पोलिस आयुक्त स्वत: लक्ष ठेवून आहेत. यासाठीच रविवारी (दि. १९) सायंकाळी वाजता कार्यालयात आलेले पोलिस आयुक्त दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. २०) दुपारी वाजताच कक्षातून उठून बाहेर गेले. सलग तेवीस तास ते कक्षातच बसून होते.
मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी रविवारी सायंकाळीच शहराबाहेरून मागवलेली पोलिस कुमक शहरात दाखल झाली आहे. बाहेरून आलेल्या पोलिसांसह आयुक्तालयातील पेालिसांचा मतदान केन्द्रावर बंदोबस्त तैनात करायचा होता. बंदोबस्त तयार करून तो सोमवारी रवाना करायचा. बंदोबस्त काढताना कोणत्याही प्रकारच्या चूका व्हायला नको, त्यामुळे बारकाईने ते पुर्ण करणे यासोबतच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना मतदानाच्या दिवशी ‘डिटेन’ करण्यासाठी त्यांची यादी तयार करून त्याला पुर्णरुप देणे, गंभीर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना बोलवून त्यांना समज देणे यासह अन्य महत्वाचे काम असल्याने पोलिस आयुक्तांनी रविवारची संपुर्ण रात्र कार्यालयातच गेली. सोमवारी दुपारी वाजता ते काही वेळासाठी जेवण करण्यासाठी गेले मात्र अवघ्या अर्धा तासात पुन्हा कार्यालयात पोहचले.
मतदानाची पुर्वरात्र ही अंत्यत महत्वाची राहते, त्यामुळे सोमवारी (दि. २०) संपूर्ण रात्रभर पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकारी अधिकारी कर्मचारी रस्त्यावर तैनात राहणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.
मतमोजणीच्या १०० मीटरमध्ये प्रवेश नाही
मनपाची मतमोजणी विभागीय क्रीडा संकुलात २३ फेब्रुवारीला सकाळी वाजतापासून सुरू होणार आहे. त्यादिवशी उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी, मतमोजणी केंद्रावरील अधिकारी या व्यतिरीक्त कोणालाही केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या २०० मीटर परिसरात कोणालाही पक्ष मंडप लावणे , मतदारांची वाहतूक करणे, जाहिरात करणे आदी बाबीवर पोलिसांकडून बंदी घालण्यात आली आहे.