आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनुन्याच्या संतोषचा पत्नीनेच केला खून, संशयित ताब्यात; कार खरेदीचा होता त्यांचा वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जनुना येथील घरातील शौचालयात संतोष मोहोड यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यानंतर संतोष यांचा खून झाल्याची बाब शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालावरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे रविवारी (दि. १६) याप्रकरणी गावातील राहुल मोहोड याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून राहुल मोहोड संतोषच्या पत्नी विरुद्ध रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. 
 
लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जनुना येथील संतोष मोहोड १२ एप्रिलपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने लोणी पोलिसात दाखल केली होती. दरम्यान, शनिवारी (दि. १५) सकाळी संतोषचा मृतदेह घरातील शौचालयात आढळून आला. त्यानंतर मृतदेह गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शव विच्छेदनानंतर पोलिसांना प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार संतोषचा मृत्यू गुदमरून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे हत्येच्या संशयावरून पोलिसांनी आज त्या दृष्टीने तपास केल्यानंतर गावातील राहुल दादाराव मोहोड (वय २६) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. ११ एप्रिलला रात्री संतोष त्याच्या पत्नीचा नविन कार घेण्यावरून वाद झाला होता. या वादानंतर संतोषचा तोंड नाक दाबून खुन करण्यात आला. खुन केल्यानंतर त्याच्या पत्नीने राहुलच्या मदतीने मृतदेह शौचालयाच्या टाक्यात टाकला. त्यामुळे शनिवारी सकाळी अपघात वाटणारा संतोषचा मृत्यू हा खुनच असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी राहुल मोहोडला ताब्यात घेतले असून संतोषची पत्नी आजारी असल्यामुळे तीच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, रात्री उशीरा दोन्ही आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लोणी पोलिस ठाण्यातून देण्यात आली. 
 
एकाला घेतले ताब्यात 
- प्राथमिक शवविच्छेदन अहवाल आम्हाला प्राप्त झाला असून, गुदमरून मृत्यू झाला असल्याचे त्यामध्ये सांगितले. त्यामुळे आम्ही एकाला ताब्यात घेतले आहे. संतोषची पत्नी ताब्यात घेतलेल्या युवकांनी संगनमत करून त्याचा खून केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.
नागेश चतरकर, ठाणेदार लोणी. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...