आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात युवकाची निर्घृण हत्या, घरासोरच केले लोखंडी राॅडने सपासप वार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर - एका युवकाने बी.ई. उत्तीर्ण युवकाच्या घरासमोर येऊन त्याच्यावर लोखंडी राॅडने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची घटना शहरातील जुन्या तहसील परिसरातील बुटी चौकात शनिवारी ( दि.१२ ) रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीची वातावरण निर्माण झाले होते. महेश प्रकाश जावरे ( २६ ) असे मृतकाचे नाव असून, याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी मारेकरी युवकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.अंकीत प्रकाश घाटे ( २१एरा.जीन्नतपुरा ) असे आरोपीचे नाव आहे. 
 
मृतक महेश जावरे हा बी.ई इजिनिअरीग केलेला होता.जुन्या वादातून ही घटना घडल्याचे समजते. घटनेतील आरोपी अंकीत घाटे हा बुटी चौक परिसरात काल शुक्रवारपासूनच हातात राॅड घेऊन फिरत होता, अशी माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. मारेकरी अंकीतने महेशवर राॅडने डोक्यावर जोरदार प्रहार केल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह उपजिल्हा रूग्णालयात हलवला. रात्री उशिरापर्यत रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. वृत्त लिहिस्तोवर पोलिसांनी आरोपी अंकीत घाटे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. 
बातम्या आणखी आहेत...