आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या तीन महिन्यातच ‘ती’च्या संसाराला पतीनेच लावले ‘नख’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
पुसद - अडीच महिन्यापूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा पतीने गळा आवळून खून केला. ही घटना तालुक्यातील बान्सी येथे सोमवारी सकाळी वाजताच्या सुमारास घडली. एेन रक्षाबंधनाच्या दिवशीस भावाला बहिनीकडून राखी बांधून घेण्याऐवजी बहिणीच्या खूनाची तक्रार पोलिस देण्याची वेळ आली.
 
याबाबत असे की, पुसद तालुक्यातील बान्सी येथील अॉटोचालक सुनिल वाघुजी बोखारे वय २५ वर्ष याचा विवाह हिवळणी तलाव येथील मनीषा सोबत मे महिण्यात झाला होता. जेमतेम अडीच तीन महिन्याचा संसार सुखात सुरू होता. त्यातच सुनिल दोन दिवसापूर्वी हिवळणी येथे सासरवाडीला जाऊन आला होता. ऐवढेच नव्हे तर रक्षाबंधनाला मनिषाला हिवळणीला घेऊन येतो, असेही सासरच्यांना सांगून आला होता. सर्व सुरळीत सूरू असतांना कुठल्याही प्रकारची संसारात तक्रार नसताना सुनिलने सोमवारी सकाळी वाजता मनिषाचा गळा आवळून खून केला. 
 
विशेष म्हणजे सुनिलच्या आई-वडीलांने सांगितल्यानुसार, दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या प्रकरणी प्रशांत दरोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनिल बोखारे याच्याविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार धनंजय जगदाळे यांच्या मार्गदर्शनात सुरू असून आरोपीच्या अटकेनंतरच खूनाच्या कारणाचा उलगडा होईल. 
बातम्या आणखी आहेत...