आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ : जावयाने केला साल्याचा खून, अनोळखी मृतदेहाच्या मृत्यूचे रहस्य उलगडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - वडगावजंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या येळाबारा शिवारात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी त्याच्या मारेकऱ्याला अटक केली. त्यात एका जावयाने पैशाच्या कारणावरून झालेल्या वादात त्याच्या साल्याचा खुन करुन त्याचा मृतदेह येळाबारा शिवारात लपवल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे. 
 
या प्रकरणी सविस्तर असे की, वडगाव जंगल पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येळाबारा शिवारात असलेल्या वाघाडी धरणाजवळ १४ जुलैला झुडपांमध्ये एका गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळुन आला होता.
 
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यात गादीत गुंडाळलेल्या मृतदेहाचे हात-पाय बांधुन असलेले, मृतदेहाच्या गळ्यावर दंडावर हत्याराचे गंभीर घाव आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्या मृतकाचा शोध सुरू केला. मृतदेहाच्या हातावर गोंदवलेल्या नावाच्या मदतीने पोलिसांनी त्याचा शोध घेतला. त्यात तो मृतदेह विष्णु महादेव शेलार वय २८ वर्षे रा. लासीना टेकडी याचा असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवली. या तपासादरम्यान मृत विष्णु शेलार याचे बहीण जावई उत्तम शंकर राजूरकर वय २८ वर्षे रा. लासीना टेकडी याच्याशी विष्णुचे भांडण झाले होते अशी माहिती पोलिसांच्या हाती आली. त्यावरुन पोलिसांनी सोमवारी सकाळी उत्तम राजुरकर याच्या गावात जावुन त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता त्याने कुऱ्हाडीचे घाव घालुन विष्णु याचा खुन केल्याची कबुली दिली. विष्णु हा घटनेच्या दिवशी माझ्या घरी आला होता त्याने पैशावरून वाद घातला. त्यानंतर मी विष्णुच्या घरी जावुन त्याच्यावर कुऱ्हाडीने वार करुन त्याला ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका गादीत गुंडाळून वाहनात टाकुन वाघाडी धरणाच्या परिसरात फेकून दिला अशी कबुलीही त्याने दिली.
 
या प्रकरणात आरोपीस अटक केल्यानंतर सायंकाळी अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी पत्रकार परिषद घेवुन या प्रकरणाची माहिती दिली.या प्रकरणात अाता आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुठल्या वाहनाचा उपयोग केला. हे काम करताना त्याला कुणी मदत केली काय, किंवा यात आनखी काही आरोपींचा समावेश आहे काय याचा शोध आता पोलिस घेत आहेत. ही संपुर्ण कारवाई पोलिस अधीक्षक एम राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी पीयुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव जंगलचे ठाणेदार दिलीप मसराम, पोलिस उपनिरीक्षक विजय घुले, सहाय्यक फौजदार बालाजी ससाणे, होमदेव कीनाके, प्रेमदास फुलके, मधुकर पवार, राजु तोडसाम, नितीन आत्राम, राजु मुत्यालवार, आशिष उईके यांनी पार पाडली. 
बातम्या आणखी आहेत...