आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीची हत्या; पतीला14 वर्षांची झाली शिक्षा; वडगाव माहोरे येथे आॅगस्ट 2014 मधील घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पत्नीला पेटवून जीवे मारल्याप्रकरणी मद्यपी पतीला येथील जिल्हा सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) एस. एस. भीष्म यांच्या न्यायालयाने १४ वर्षे सश्रम कारावास, २० हजार रुपये दंड दंड भरल्यास वर्षे अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. ही घटना नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव माहोरे येथे ऑगस्ट २०१४ रोजी घडली होती.नारायण भुजंगराव मोरे (४३ रा. वडगाव माहोरे) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याने पत्नी जया (३५) यांची पेटवून हत्या केली होती. 
 
न्यायालयात दाखल दोषारोपपत्रानुसार मूळचा कसबेगव्हाण येथील रहिवाशी नारायण मोरे हा वडगावला वास्तव्यास होता. या काळात वडगावातीलच रहिवाशी जया यांच्यासोबत नारायणचा ३० एप्रिल २०१४ रोजी विवाह झाला. लग्नानंतर नारायण पत्नी जयासोबत बुधागडला गेला. एक महिना तेथे वास्तव्य केल्यानंतर नारायण पत्नी जयाला घेवून वडगावला परत आला आणि येथे सासरवाडीतच राहायला लागला. यावेळी जयाच्या भावांनी नारायणला घरसुध्दा बांधून दिले. काही दिवस सुखात गेल्यानंतर नारायण दारू पिवून पत्नी जयाचा छळ करु लागला. पैसे आणण्यासाठी तिला मारहाणसुध्दा करण्यात आली. त्यामुळे जया यांचे भाऊ अमोल पुंडलिक कांबळे यांनी दोन वेळा नारायणला प्रत्येकी २० हजार रुपये दिले. मात्र नारायणची मागणी वाढतच होती. दरम्यान ऑगस्ट २०१४ रोजी रात्री दारूड्या नारायणने पुन्हा पत्नी जयासोबत वाद घातला. या वादात नारायणने पत्नी जयाच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. ही बाब शेजारच्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती जया यांचे भाऊ अमोल मंगेश यांना दिली. त्यांनी तातडीने जयाचे घर गाठले. यावेळी त्यांना जया जळालेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी ऑगस्ट २०१४ रोजी मृतक जया यांचा भाऊ अमोल कांबळे यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी नारायणला अटक करुन त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून अारोपपत्र दाखल केले होते. 
 
बातम्या आणखी आहेत...