आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताविरुद्ध दुसरी कसाेटी; इंग्लंडच्या राॅलिन्सचे शतक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - यजमान भारताविरुद्ध १९ वर्षांखालील दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाचे युवा फलंदाज डेलरे राॅलिन्स (नाबाद १२४) अाणि विल जॅक्स (नाबाद ६६) चमकले. या दाेघांच्या १३१ धावांच्या अभेद्य भागीदारीच्या बळावर इंग्लंडने पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर ५ बाद २४३ धावा काढल्या.
 
भारताकडून युवा गाेलंदाज ऋषभ भगतने २ विकेट घेतल्या. कनिष्क सेठ,  हर्ष अाणि डेरिल फरेराेने प्रत्येकी १ गडी बाद केला.  नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडची निराशाजनक सुुरुवात झाली. तिसऱ्या षटकापर्यंत इंग्लंडने एका धावेसाठी तीन विकेट गमवल्या. त्यानंतर राॅलिन्सने संघाचा डाव सावरला. त्याने अाेली पाेपसाेबत (४२) चाैथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी केली. 
बातम्या आणखी आहेत...