आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाच्या राजकीय कुरघोडीत अडकली शहराची स्वच्छता, सर्वसामान्य जनतेला फटका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सत्ताधारी आणि प्रशासनाच्या राजकीय कुरघोडीत अमरावती शहराची स्वच्छता अडकल्याचे चित्र महापालिकेत दिसून येत आहे. सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेला साफसफाई विषयक प्रस्ताव आरोग्य विभागाकडून येत नसल्याने मागील अनेक महिन्यांपासून यावर एकमत होत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेतील या अंतर्गत दंगलीचा फटका मात्र सर्वसामान्य अमरावतीकरांना बसत अाहे. 
 
प्रभाग निहाय दैनंदिन साफसफाई कंत्राट जानेवारी २०१७ मध्येच संपुष्टात आला आहे. मात्र अद्याप नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्याकरीता प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला विषय स्थायी समितीच्या पचनी पडत नसल्याचे दिसून येत आहे, तर स्थायी समितीला अपेक्षित असलेला प्रस्ताव प्रशासनाकडून अद्याप आलेला नाही. दैनंदिन साफसफाईच्या विषयाला घेऊन स्थायी समिती प्रशासनादरम्यान तणातणी वाढल्याने घाणीच्या साम्राज्यात राहण्याची वेळ अमरावतीकरांवर आली आहे. प्रभाग निहाय दैनंदिन साफसफाई कंत्राटदारांची नियुक्त करण्याकरीता डिसेंबर २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 

निविदा मागविण्यात आल्यानंतर प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही किंवा रद्द केलेली नाही. त्यामुळे अनेकांची निविदेसोबत भरण्यात आलेली रक्कम अद्याप महापालिकेकडे पडून असल्याची माहिती आहे. कंत्राट संपून तब्बल आठ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर देखील नवीन यंत्रणा निर्माण केल्याने शहरात घाणीचे साम्राज्य वाढत आहे. दैनंदिन साफसफाईचा कंत्राट संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जानेवारी महिन्यापासून स्वाईन फ्लू या गंभीर आजाराचे एक दोन नव्हे तर तब्बल ११० संशयित रुग्ण शहरात आढळून आले. महापालिका क्षेत्रात ३४ नागरिकांना स्वाईन फ्ल्ूची लागण झाल्याने प्रयोग शाळेच्या अहवालावरुन निष्पन्न देखील झाले. दैनंदिन साफसफाई तसेच जागो जागी कचऱ्याचे ढिगारे साचलेले असल्याने हजारांपेक्षा नागरिक तापाने फणफणत असल्याचे वास्तव आहे. शहरात डम्प होत असलेल्या कचऱ्यामुळे शहराचे सार्वजनिक अाराेग्य धोक्यात आले असताना देखील महापालिकेत गतिमानता दिसून येत नसल्याची चर्चा आहे. आठ महिन्यांपूर्वी मुदत संपुष्टात आलेल्या उर्वरित.पान 
 
स्वच्छतेवर परिणाम नाही 
साफसफाईचा कंत्राट संपला ही वस्तुस्थिती आहे. निवडणूक आचारसंहितेमुळ निविदा प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. निवडणुकीनंतर स्थायी समितीकडून एकच कंत्राटदार नेमण्याबाबत विषय आल्याने पूर्वीची प्रकिया थांबली. स्वच्छतेबाबत दक्षता घेतली जात आहे. 
- हेमंत पवार, आयुक्त, महापालिका, अमरावती. 
 
ब्लॅक लिस्टेटची धास्ती 
सत्तांतर झाल्यानंतर कंत्राटदारांची देखील सफाई सुरू असल्याची चर्चा आहे. मर्जीतील व्यक्तींना कंत्राटी कर्मचारी म्हणून घेण्यासाठी कंत्राटदारांना ब्लॅक लिस्टेट करण्याच्या तक्रारींचा ओघ वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांमध्ये देखील ब्लॅक लिस्टेट करण्याची धास्ती जाणवत अाहे. 
 
देयके देणे सुरूच 
शहरात घाणीचे साम्राज्य परसले असले तरी त्याचा प्रशासनावर कोणताच परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेचा बोजवारा उडाला असताना कंत्राटदारांची देयके मात्र नियमित दिली जात आहेत. मात्र पीएफचे चालान भरल्यानंतर ही रक्कम कंत्राटदारांना मिळत आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...